लस घेतल्यानंतर एक WhatsApp मेसेज करून मिळवा लस प्रमाणपत्र, ही आहे सोपी पध्दत

काही दिवसांपूर्वी कोरोनामूळे खुप भयानक परिस्थिती उद्भवली होती. ग्रामीण भागात तर परिस्थिती खुपच खराब होती. अलिकडच्या काळात परिस्थितीमध्ये जरा सुधार बघायला मिळत आहे. कोरोनाची लागण होण्यापासून वाचण्यासाठी नियमांचे कठोर पालन करणे आणि लसीकरण हे दोन पर्याय सद्या लोकांकडे आहे. लसीकरणाविषयी सुरवातीच्या काळात लोकांमध्ये गैरसमज होते. पण अलिकडच्या काळात लसीकरण केंद्रावर भक्कम गर्दी होत आहे. लोकांमध्ये लसीकरणाचे महत्व वाढत चालले आहे त्यामूळे तरून असो की वयोवृद्ध सर्वच लस टोचून घेण्यासाठी धडपडत आहे.

लसीकरण जेवढे महत्वाचे आहे तेव्हढेच लसीकरण झाल्यानंतर मिळणारे सर्टिफ़िकेट महत्वाचे आहे. लसीकरण सर्टिफ़िकेट दोन पध्दतीने डाउनलोड करता येते एक Covin या वेबसाइट वरून तर दुसरे आरोग्य सेतू या app वरून पण आता तुम्हाला WhatsApp वरून देखील डाउनलोड करता येणार आहे. गूगल वर Covin सर्च करून सर्टिफ़िकेट डाउनलोड करणे बऱ्याच लोकांना अवघड जाते. अशा लोकांसाठी WhatApp हा सर्टिफ़िकेट डाउनलोड करण्यासाठी सोपा मार्ग असणार आहे. (Get vaccination certificate after vaccination via WhatsApp message)

असे करा डाउनलोड
त्यासाठी तुम्हाला मोबाइल मध्ये  +91 9013151515 हा MyGov कोरोना हेल्पडेस्कचा नंबर सेव करावा लागेल. या नंबर वर फक्त तुम्हाला Download Certificate असा मेसेज टाईप करून पाठवा लागेल. तुम्ही लस घेतेवेळी रजिस्टर्ड केलेल्या मोबाइल नंबर वर एक OTP येईल. तो OTP पुन्हा त्याच नंबर वर पाठवावा लागेल. जर तो मोबाइल नंबर एका पेक्षा जास्त व्यक्तींनी रजिस्टर्ड केला असेल तर तुम्हाला ते सर्व ऑप्शन दिसायला लागतील. जे प्रमाणपत्र हवं आहे ते टाईप करा. नंतर तुम्हाला ते प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.

रोचक तथ्य व महत्वाच्या घडामोडी आपल्या फोन वर नियमित मिळवण्यासाठी ReadMarathi.Com चा WhatsApp ग्रुप जॉईन करा