मिरचीला येणार अच्छे दिन, ‘या’ कारणामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट..!

मिरची म्हणजे आपल्या जेवणाचा खूप महत्त्वाचा भाग. महाराष्ट्रात तर खूपच तिखट खाल्ले जाते. मिरचीचा तसा दोन प्रकारे जेवणात वापर केला जातो एक हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर. आपल्या भाजीपाल्यात हिरव्या मिरचीचा वापर जास्त केला जातो. त्यामूळे हिरव्या मिरचीला वर्षभर मागणी असते.

यावर्षी चांगला भाव मिळेल म्हणून शेतकरी दरवर्षी मोठ्या अपेक्षेने मिरचीची लागवड करत असतात. एखाद्या वर्षी मिरची चांगले उत्पन्न देऊन जाते तर एखाद्या वर्षी शेतकर्‍यांना रडायला लावते. “आता यावर्षी तरी मिरची पावेल” अशी आशा ठेवणार्‍या शेतकर्‍यांसाठी अलीकडेच एक आनंदाची बातमी आली आहे. आता लाल मिरची पावडर बरोबरच हिरवी मिरची पावडर पण बनवता येणार आहे. त्यामूळे यावर्षी हिरव्या मिरचीची मागणी वाढण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.(Good days will come for chillies, farmer’s income will double due to this reason)..

लाल बरोबर हिरवी मिरची पावडर तंत्रज्ञान विकसित

आता आपल्याला हिरव्या मिरची पासून पावडर बनवता येणार आहे. काही दिवसांपूर्वीच वाराणसीच्या (Varanasi) भारतीय भाजी संशोधन संस्थे(IIVR)  कडून हिरव्या मिरचीची पावडर बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान हाताळण्यास सहज सोपे असल्यामूळे या तंत्रज्ञानाचा वापर अगदी सामान्य शेतकरी पण करू शकणार आहे.

हे तंत्रज्ञान विकसित करण्यात हिमाचल प्रदेश येतील होल्टन या कंपनीचे पण सहकार्य आहे. या तंत्रज्ञानामूळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना मिळेल अशी माहिती संस्थेच्या संचालकांनी दिली आहे. या तंत्रज्ञानाची IIVR च्या नावावर पेटंट नोंदणी झाल्याची देखील माहिती मिळाली आहे..

हे पण वाचा – बाप रे ! शेतकर्‍याने अडीच एकरात घेतले तब्बल 18 लाखांचे उत्पन्न; ‘या’ पिकाची केली शेती..!

शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होणार

हिरवी मिरचीची बाजारात आवक जास्त झाल्यानंतर मिरची बाजारात कवडी मोल विकली जाते. पण आता हे तंत्रज्ञान आल्यामूळे शेतकरी बाजारातील भाव कमी झाल्यानंतर मिरचीची पावडर बनवून नंतर थेट बाजारात किंवा मोठ्या कंपन्यांना विकू शकणार आहे. इतर कंपन्यापण पावडर निर्मितीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. खाजगी कंपन्यांना हे तंत्रज्ञान हस्तांतरित होणार असून त्यामुळे आता खाजगी कंपन्या हिरवी मिरचीची खरेदी करून पावडर निर्मिती करणार आहे. त्यामुळे हिरवी मिरचीची अधिक मागणी वाढून भाव वाढण्यास मदत होईल आणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल…

हिरवी मिरची आरोग्यासाठी उत्तम

हिरव्या मिरचीत व्हिटॅमिन ‘C’ चे 30% पेक्षा जास्त प्रमाण आहे. तसेच पावडर मध्ये 94 ते 95% क्लोरोफिल आणि  64 ते 65 % कॅपसेसिन पोषक तत्व आहे. हे पावडर दीर्घकाळ पण टिकू शकते. म्हणून हिरवी मिरची पावडर आरोग्यासाठी उत्तम आहे.

शेतमालाचे ताजे बाजार भाव, हवामान अंदाज, कृषी योजनांचे अपडेट्स आणि शेती विषयक सर्व माहिती मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Reply

Your email address will not be published.