खुशखबर! हे देश करणार भारताला मदत..!

दिल्ली : देशातील काही राज्यांची परिस्थिती अतिशय भयानक अवस्थेत आहे. या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी देशात आरोग्य साधनांचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारताने लस उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी अमेरिकेकडे मदतीचे हात पसरले होते. परंतू अमेरिका सरकारने भारताला निराश केले होते. पण दरम्यान एक चांगली बातमी मिळाली आहे. जगातील तब्बल दहा देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मदतीसाठी नकार देणाऱ्या अमेरिकेने देखील भारताला सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. ब्रिटन, सौदी अरेबिया, आॅस्ट्रेलिया या सारखे मोठे राष्ट्र देखील भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहे.

ब्रिटनचे भारतातील राजधूत अॅलेक्स इलिस यांनी भारताला मदती संबंधित एक ट्वीट केले आहे. या कोरोना विरुध्द लढाईत वैद्यकीय उपकरणांसहीत आम्ही आमच्या भारतीय मित्रांना मदत करण्यास तयार आहोत. आपन हा लढा एकत्र नक्कीच जिंकू असं त्यांनी ट्वीट च्या माध्यमातून सांगितलं आहे.

युरोपिय मंडळाचे अध्यक्ष चार्लस मिशेल यांनी सुध्दा भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की ‘ही लढाई एकट्या भारताची नसून सर्वांची लढाई आहे. युरोप भारतीयांच्या पाठीशी आहे. 8 मे ला भारत व युरोप समुदायाची बैठक आहे तेव्हा चर्चा तर केलीच जाईल पण त्याआधी आम्ही मदत करण्यास तयार आहोत. असं त्यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी भारताला कच्चा माल देण्यास नकार देणाऱ्या अमेरिकेने देखील मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी परिस्थिती बद्दल चिंता व्यक्त करत आम्ही आपल्या सोबत असल्याचं ट्वीट केलं आहे.

तसेच पाकिस्तान आणि चीन यांनी सुध्दा भारताला मदत करण्याची मानसिकता दाखवली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री झाओ लिजियान यांनी सांगितले की, आम्ही भारताशी संपर्क साधला आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी भारतातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली असून या संकटाशी जागतीक पातळीवर सामना करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment