यंदा सोयाबीन, कापसाच्या हमीभावात वाढ, जाणून घ्या यंदा काय मिळणार हमीभाव..!

शेअर करा

अलीकडेच केंद्र सरकार कडून 2022-23 या या वर्षाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आले आहे. सर्वच पिकांच्या हमीभावात चांगली वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात जास्त वाढ तीळाला मिळाली आहे.

सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात देखील चांगली वाढ मिळाली आहे. या लेखात आपण विशेषतः सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात कितीने वाढ झाली? हे जाणून घेणार आहोत. त्यासोबतच इतर 12 पिकांचे या वर्षीच्या खरीपाचे हमीभाव काय आहे याची देखील सविस्तर माहिती पाहणार आहोत..

यंदा सोयाबीनच्या हमीभावात 350 रुपयांनी वाढ केलेली आहे. मागच्या खरीप हंगामात (2021-22) सोयाबीनच्या हमीभावात फक्त 70 रुपयांची वाढ करून 3950 रुपये हमीभाव मिळाला होता. आता 350 रुपयांची वाढ करून 4300 रुपये हमीभाव सोयाबीनसाठी जाहीर करण्यात आला आहे.

येथे वाचा  – कापसाचे हे टॉप १० बियाणे (वाण) तुम्हाला बनवतील लखपती..!

कापसाच्या हमीभावात या खरीपासाठी 355 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. मागच्या खरिपात (2021-22) 6025 रुपये भाव जाहीर केला होता. आता या खरीपासाठी (2022-23) 355 रुपयांची वाढ करून 6380 रुपये दर जाहीर केला आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावात तिळाला सर्वाधिक हमीभाव म्हणजेच 523 रुपये वाढून मिळाला आहे. खरीप हंगाम 2021-22 मध्ये केंद्र सरकारने 7307 हा हमीभाव जाहीर केला होता. आता सरकारने 2022-23 च्या खरीप हंगामासाठी तीळाला 523 रुपयांनी वाढ करून 7830 रुपये हमीभाव जाहीर केला आहे.

येथे वाचा  – अजित पवारांची मोठी घोषणा; 1 जुलै रोजी ‘या’ शेतकर्‍यांना मिळणार 50 हजार रुपये..!

तुरीला मागील खरिपात (2021-22) 6300 रुपये हमीभाव मिळाला होता. यंदाच्या या खरिपात (2022-23) 300 रुपयांची वाढ करून 6600 रुपये हमीभाव तुरीला जाहीर करण्यात आला आहे.

मूग पिकाला मागील खरिपात (2021-22) 7275 रुपये हमीभाव मिळाला होता. यंदाच्या या खरिपात (2022-23) 480 रुपयांची वाढ करून 7755 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

उडीद पिकाला मागील खरिपात (2021-22) 6300 रुपये हमीभाव मिळाला होता. यंदाच्या या खरिपात (2022-23) 300 रुपयांची वाढ करून 6600 रुपये हमीभाव उडीदाला जाहीर करण्यात आला आहे.

यंदा मका पिकाला सर्वात कमी हमीभाव मिळाला आहे. मक्याच्या हमीभावात फक्त 92 रुपयांची वाढ केलेली आहे. मागच्या खरिपात (2021-22) 1870 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला होता. यंदा हा हमीभाव 92 रुपयांनी वाढवून 1962 रुपये जाहीर केला आहे.

भात पिकाला यंदा 2040 रुपये हमीभाव मिळाला आहे तर ज्वारीला – 2970, बाजरीला – 2350, रागी – 3578, भुईमूग – 5850, सूर्यफूल – 6400, कारळे – 7287 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत..

ताजे बाजार भाव आणि शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा..