हाफकीन संस्थेला मिळाली परवानगी, राज ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार..!

मुंबई : देशात कोरोना महामारीचा कहर सुरुच आहे. महामारीला अटकाव घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. व्हायरसचा बंदोबस्त करण्यासाठी लसीकरण जोरात सुरू आहे. पण काही राज्यांमध्ये लसींची टंचाई निर्माण झाल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली. लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना खाली हात परतावे लागत होते.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. लसींची टंचाई दुर करण्यासाठी लस उत्पादन करण्याची परवानगी हाफकीन संस्थेला द्यावी, अशी मागणी आपन पंतप्रधान मोदींकडे केली होती आणि त्यांनी ती मागणी मान्य केल्याचे ट्वीट द्वारे सांगितले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही पंतप्रधानांकडे मागणी केली होती. महाराष्ट्रातील लसींची कमतरता दुर करण्यासाठी आणि लसीकरनाला वेग देण्यासाठी हाफकीन संस्थेला परवानगी देण्यात यावी अशी विनंती महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला केली होती, ती मागणी केंद्र सरकार ने मान्य केली. त्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना परवानगी विषयी पत्र पाठवले होते. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता हाफकीन संस्थेने लवकरात लवकर उत्पादन सुरू करावे असे या पत्रात म्हटले होते. हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोव्हॅक्सिन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment