हरभऱ्याच्या या स्थितीत योग्य काळजी घ्या, भरपूर उत्पन्न होईल..!

सर्व शेतकरी मित्रांचं ReadMarathi.Com मध्ये स्वागत आहे. मित्रांनो रब्बीचा हंगाम सुरू झालेला आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची लागवड झालेली आहे. बऱ्याच दिवसांपासून सतत दोन ते पाच दिवसानंतर येणारं ढगाळ वातावरण हरबरा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण करत होतं. आता ते दुर होऊन कुठे तरी थंडीची झलक दिसू लागली आहे. (Harbara crop management in Marathi)

मराठवाडा व विदर्भातील रब्बी मधील प्रमुख पीक असलेला हरबरा वाढत्या थंडीमुळे टवटवीत झाला आहे. हरबरा आता फुल धारणा करत असून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्याल?


1. तीस ते पन्नास टक्के फुलधारणा झाल्यानंतर शेंडे खुडनी टाळने – शेंडे खुडनी केव्हा करायची याचं काही एक उत्तर सांगता येणार नाही. प्रतेक जन वेगवेगळं सांगत असतो. पण आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की हरभऱ्याला फुले लागण्याअगोदरच शेंडे खुडनी करायची आहे कारण फुले लागण्याच्या स्थितीत शेंडे खुडनी जर आपन केली तर फुले गळण्याचा धोका उद्भवू शकतो..

2. फुले लागत असताना फवारणी वेळेवर करणे – फवारणीचं सर्वात जास्त महत्व फुले लागण्याच्या काळात असतं. किटकनाशक आणि टॉनीक जर या दरम्यान वेळेवर फवारले गेले तर आपल्याला याचा चांगला परिणाम दिसून येतो. किटकनाशकमुळे आळी नियंत्रणात येऊन फुलं व फांद्यांची सुरक्षा होते तसेच टॉनीकमुळे झाडाची चांगली वाढ होऊन चांगल्या प्रामाणात फुले लागण्यास मदत होते. ही फवारणी साधारणतः पहिली फवारणी झाल्यानंतर 20 ते 25 दिवसात होणं गरजेची असते. त्यामूळे फुले लागण्याच्या काळात फवारणीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे…

Harbara Vyavsthapan

(3) 50 ते 70 टक्के फुल धारणेच्या अवस्थेत पाणी भरणा टाळणे – बरेच शेतकरी मित्र, फुल धारणा झाल्यानंतर पाणी भरणा करत असतात. त्यामुळे झाडाला लागलेली फुले गळण्याचा धोका असतो. म्हणून पाणी भरणा फुल धारणा होण्या अगोदर आणि घाटा बनल्यानंतर करायला पाहिजेत.

या सर्व गोष्टी जर वेळेवर केल्यात तर आपल्याला चांगला परिणाम नक्कीच दिसून येईल…

Disclaimer – शेती मध्ये येणाऱ्या पीकावर शेतकरी वर्षभर आपला उदारनिर्वाह करत असतो. त्यामुळे पीकाला खतं देण असो की औषद फवारणी हे सर्व करत असताना एक्सपर्ट व अनुभवी लोकांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे…

Leave a Comment