‘या’ शेतकऱ्याने सिध्द करून दाखवलं… फक्त दसरा, दिवाळीच नाही तर इतर वेळेतही झेंडूची शेती करून कमावतो लाखो रुपये…!

सर्व शेतकरी बांधवांचं ReadMarathi.Com वर स्वागत… मित्रांनो, या लेखात तुम्हाला अशा शेतकऱ्याची ओळख करून देणार आहोत की ज्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज दुर केला आहे. हो, खरचं आणि त्यांचा या पध्दतीने शेती करण्याचा प्रवास आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी खुपच प्रेरणादायी ठरणार आहे.

Jhendu phul | Marigold

कारण ‘हा’ शेतकरी फक्त दसऱ्यालाच नाही तर इतर वेळेतही झेंडूची नियोजन पध्दतीने शेती करून आपल्या 3 एकरात वर्षाला जवळपास 10 ते 12 लाख रुपये कमवत असल्याचं स्वतः शेतकरी सांगतो..(This farmer has proved .. He earns lakhs of rupees by cultivating marigold not only on Dussehra and Diwali but also at other times …!)

हे पण वाचा

आजचे 5 वाजेपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव दि.02/01/2022 वार – रविवार

झेंडूच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवणारे प्रवीण जगताप

आपन आज ज्यांच्या बद्दल महिती घेणार आहोत ते शेतकरी बीड जिल्ह्यातील सावरगावचे रहिवासी असून त्यांचं नाव प्रवीण जगताप आहे. त्यांचं शिक्षण 12 वी पर्यंत झालेले आहे. शेतीमध्ये काम करण्याची आवड असल्यामूळे 12 वी नंतर लगेच ते शेतीकडे वळले. त्यांच्याकडे एकून शेत जमीन 7 एकर आहे. ते सांगतात की सुरुवातीला या 7 एकरामध्ये पारंपारिक पध्दतीचे पीके घेतली जात होती. पण मागील 3 वर्षांपासून त्यांच्या 3 एकरा मध्ये ते झेंडूची शेती करत आहे. आणि आता त्यांना यातून वर्षाकाठी लाखो रुपयाचे उत्पन्न मिळत आहे.

Jhendu che phul

त्यांच्या म्हणण्यानुसार दसरा सनाच्या काळात झंडूला खुप मागणी असते. त्यावेळी चांगले उत्पन्न यातून काढता येते. पण सप्टेंबर नंतरचा काळ झेंडूसाठी बेस्ट असल्याचं असही ते म्हणतात. फुले विक्रीसाठी ते स्थानिक बाजरावर अवलंबून नाही. ते त्यांच्या शेतातील फुले हैद्राबादला विक्रीसाठी पाठवतात. हैद्राबाद व कल्याण येथे झेंडू फुलांसाठी मोठी बाजारपेठ असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली.

झेंडू शेतीसाठी येणारा खर्च आणि उत्पन्न

त्यांची ही झेंडूची शेती 3 एकरात पसरलेली आहे. त्यांना एक एकरात लागवडी पासून ते तोडणी करण्यापर्यंत जवळपास 1 लाख रुपये खर्च येत आहे. त्यांच्या एकून 3 एकर झेंडू शेतीला 3 लाख रुपये खर्च येतो. आणि ते त्यातून 10 ते 12 लाख रुपयाचं उत्पन काढत असल्याचं ते सांगतात.

झेंडू पिकाचे व्यवस्थापन (Marigold crop management)

प्रवीण जगताप यांनी या वर्षी झेंडूची लागवड सप्टेंबर महिन्यात केली. त्यांना या मध्ये 30 हजार रोप आणावी लागली. म्हणजे एका एकरा मध्ये 10 हजार रोप त्यांना लागली. सुरवाती पासून ते शेवट पर्यंत त्यांचा या 3 एकर शेतीला 3 लाख खर्च येतो. मार्तंड जातीच्या रोपांची त्यांनी या वर्षी लागवड केली आहे.

झेंडूवर भुरी आणि करप्या रोग पडत असतो. त्यासाठी ते दर आठ दिवसाला औषध फवारणी करतात. झेंडूला पाण्याची कमी प्रमाणात गरज असते. पण तोडा तोडल्यानंतर येणाऱ्या फुलांना फुगवण्यासाठी पाणी द्यावे लागत असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली..

शेती व बाजारभाव विषयक माहितीसाठी आमचा Whats App ग्रुप जॉईन करा..

Leave a Reply

Your email address will not be published.