Monsoon : मुंबईत धो-धो पाऊस, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता..!

मुंबई : वाढत्या तापमानाला कंटाळलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून आता राज्यामध्ये आपली मुळं रुजवायला सुरवात केली आहे. मान्सून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाला आहे. मुंबईमध्ये रात्रीपासून पावासाने जोरदार हजेरी लावली. दादर, अंधेरी आणि मुंबईच्या अनेक भागात पाऊस धडकला. नवी मुंबई आणि ठाणे ह्या भागातही पावसाने हजेरी लावली यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळाला आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे तसेच बऱ्याच दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाची प्रतिक्षा आता संपली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यातील 16 जिल्ह्यात पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामध्ये राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या भागातील जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे. काही भागात जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे. मुंबईलगत काही भागात रिमझिम पाऊस देखील होत आहे.

Monsoon in Maharashtra

जालन्यात मुसळदार पाऊस
जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. जालना शहरासह भोकरदन शहर व ग्रामीण भाग या ठिकाणीही जोरदार पाऊस झाला.

जोरदार पाऊसामूळे संपर्क तुटला…
नाशिक जिल्ह्यातील तळेगाव रोही इथे जोरदार पाऊस झाला. ढग फुटी झाल्या सारखा हा पाऊस होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी नागरिकांना ट्रैक्टरची मदत घ्यावी लागली.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment