राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; पहा कुठे किती पाऊस?
हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ(Vidharbh) या भागाचा समावेश आहे. तसेच मराठवाड्यात काय परिस्थिती असेल याची देखील माहिती मिळाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. मॉन्सून ज्या गतीने पुढे सरकतोय ती गती मंद स्वरूपाची आहे.
येत्या पाच दिवसात पुढील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे – 1) रत्नागिरी, 2) रायगड, 3) पालघर, 4) ठाणे… तर या समोरील जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे – 1) सातारा, 2) सांगली, 3) नाशिक, 4) जळगाव, 5) कोल्हापूर, 6) अहमदनगर…
येथे वाचा – शेतकर्यांनो पेरणी करताय? पंजाब डख यांची शेतकर्यांना विनंती; पहा 2 जुलै पर्यंतचा नवीन हवामान अंदाज..!
काही जिल्ह्यांमध्ये तर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये 1) हिंगोली, 2) बीड, 3) उस्मानाबाद, 4) लातूर, 5) नांदेड, 6) सोलापूर, 7) परभणी, 8) जालना, 9) औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.
पेरणीच्या कामांना सध्या वेग आलेला आहे. बर्याच भागात तर 75 टक्के पेरण्यांची कामे उरकली आहे. आता शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येत्या पुढील पाच दिवसात राज्याच्या वेग वेगळ्या भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्यामूळे पेरणी करून बसलेल्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथे वाचा – कापूस लागवड करताय? मग हे तण नाशक फवारा आणि करा तणाचे व्यवस्थापन..!
ताजे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक माहितीसाठी ReadMarathi.Com चा WhatsApp ग्रुप जॉईन करा…