Home Loan : घर खरेदी करायची जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच अशावेळी तुम्हाला गृह कर्जाची गरज भासू शकते. अशावेळी तुम्हाला काही जास्तीचे चार्जेस सुद्धा द्यावे लागतात. आज बघितले तर अनेक बँकांच्या माध्यमातून आपण गृह कर्ज घेऊ शकतो. परंतु प्रत्येक बँकेचे शुल्क हे वेगवेगळे असलेले आपल्याला पाहायला मिळतील. विविध बँकांच्या गृह कर्जाचा तुम्ही थोडाफार जरी अभ्यास केला तरी ते तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. बँकेच्या शुल्क जर तुम्हाला माहित असतील तर नक्कीच अशा वेळी तुम्ही निर्णय घेऊ शकता की आपण कोणत्या बँकेच्या माध्यमातून किंवा कोणत्या संस्थेच्या माध्यमातून कर्ज घ्यावे. गृह कर्ज घेत असताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे.
गृह कर्जाच्या अर्ज प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क या ठिकाणी आकारले जातात. तुम्हाला कर्ज मिळेल की नाही याचा संबंध या शुल्कशी अजिबात नसतो आणि ते परत सुद्धा होत नाहीत. जर तुम्ही विविध बँक किंवा संस्थेकडे अर्ज सबमिट केला असेल आणि नंतर तुमचा काही कारणास्तव विचार बदलला तर अशावेळी तुमच्या अर्जाचे जे काही शुल्क असतील ते वाया जातील (Home Loan interest rate). त्यामुळे सर्वात प्रथम अर्ज करत असताना नक्की तुम्हाला कोणत्या संस्थेकडून किंवा बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करायचे आहे याची पूर्णपणे खात्री करावी.
खुशखबर! आता म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी या तारखेपर्यंत करू शकता अर्ज, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी, येथे क्लिक करून पहा बातमी..
कर्जाच्या अर्जासोबत हे शुल्क आगाऊ घेतली जातात आणि प्रक्रिया शुल्क अजिबात परत मिळत नाही. परंतु काही विशिष्ट बँक आहेत त्या या फी चा काही भाग अर्ज करत असताना आणि काही भाग कर्ज मिळवून देत असताना घेतात (Home Loan calculator). हे शुल्क आहेत ते कर्जाच्या टक्केवारीप्रमाणे विविध वित्तीय संस्था तसेच बँकांच्या माध्यमातून ठरवले जातात. जर एखाद्या बँकेची इच्छा असेल तर ते माफ ही होऊ शकते. व्यवस्थापनामध्ये जर तुम्ही तज्ञ असेल तर अशावेळी नक्कीच तुम्ही हे शुल्क माफ करून घेऊ शकता किंवा यामध्ये कमी करू शकता.
काय सांगता! मुंबईत म्हाडाचे घर फक्त एवढ्या लाखात, येथे क्लिक करून पहा किंमती आणि अर्ज प्रक्रिया..!
या ठिकाणी गृह कर्जाची निवड करताना एक मोठा शुल्क आहे तो तुम्हाला भरावा लागेल. हे सहसा गृह कर्जावरील असणाऱ्या टक्केवारीच्या स्वरूपामध्ये व्यक्त केले जाते. तसेच कर्ज घेण्यासाठी तुमची काही रक्कम असेल त्याचा एक मोठा भाग बनवला जातो (Home Loan tax benefit). काही संस्थांच्या माध्यमातून गृह कर्ज उत्पन्न हे आणखी आकर्षक बनवण्याकरिता या शुल्क मध्ये सूट देतात किंवा शुल्क माफ करतात.
मालमत्तेची कायदेशीर स्थिती तपासण्याकरिता या ठिकाणी आर्थिक संस्था जास्तीत जास्त बाहेरील वकीलच नियुक्त करतात. अशावेळी वकील जे शुल्क आकारतात ते शुल्क व्यक्ती संस्था त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून वसूल करते. परंतु अशावेळी एखाद्या मालमत्तेला संस्थेच्या माध्यमातून पूर्वीच कायदेशीर मान्यता दिलेली असेल तर अशावेळी शुल्क आकारले जात नाहीत. ज्या प्रकल्पामध्ये तुमची गुंतवणूक होणार आहे तो प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून मंजूर झाला आहे की नाही हे शोधावे. अशाप्रकारे नक्कीच तुम्ही तुमचे कायदेशीर शुल्क वाचवू शकता.
महिलांना पुरुषांपेक्षा मिळते खूपच स्वस्त होम लोन, येथे क्लिक करून पहा बातमी..
प्रीपेमेंट म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कर्ज धारक व्यक्तीच्या कर्जाचा कालावधी हा संपण्यापूर्वी संपूर्ण रक्कम किंवा थोडीफार रक्कम त्या ठिकाणी भरावी लागते. यामुळे नक्कीच बँकेला व्याज दरामध्ये तोटा होतो. अशावेळी हा तोटा भरून काढण्याकरिता बँका थोड्या प्रमाणात दंड आकारतात. वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून आकारलेले शुल्क वेगवेगळे असतात (Home Loan eligibility). हे कर्जाच्या प्रकरणावर सुद्धा अवलंबून असतात. परंतु रिझर्व बँकेने सर्व बँकांना व्याजदरच्या माध्यमातून घेतलेल्या गृहकर्जावर प्री पेमेंटचे दंड अजिबात आकारू नयेत असे निर्देश जाहीर केले आहेत. फिक्स्ड रेट होम यांना साठी फ्लॅट रेट प्री पेमेंट या प्रकारचा दंड आकारला जातो. ज्या माध्यमातून आगाऊ भरलेली रक्कम दोन टक्क्यांनी जास्त असते. गृह कर्जाचे वेळेपूर्वी परतफेड जर तुम्हाला करायचे असेल तर अशावेळी या गोष्टीचा विचार करावा लागेल.
म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!
काही संस्था कर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तसेच मंजूर केल्यानंतर निर्दिष्ट कालावधीमध्ये कर्ज घेतले नसेल तर वचनबद्धता शुल्क या ठिकाणी आकारतात. हे एक प्रकारचे शुल्कच आहे. जे वितरित न केलेल्या कर्जावर आकारले जातात. उदाहरणार्थ बांधकाम कर्ज असते त्यासाठी कर्ज वितरण करण्यासाठी प्रकल्पाचा पूर्णत्वाचा प्रमुख टप्पा असतो. काही कर्ज देणाऱ्या संस्था ह्या आपल्यासाठी क्रेडिट लाईन खुली ठेवतात आणि विशिष्ट रक्कम आकारतात. ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्ही ह्या कर्जाचा लाभ घेऊ शकता (Home Loan information). हे शुल्क आहे ते सहसा मंजूर तसेच विक्रीत केलेल्या रकमेमधील फरकाची टक्केवारी म्हणून आकारतात. गृह कर्ज घेणाऱ्या नागरिकांना वर नमूद केल्याप्रमाणे शुल्क विषयी माहिती असणे फारच गरजेचे आहे. तसेच आजच्या या लेखाप्रमाणे जागरूक राहून जास्तीत जास्त चार्जेस कसे टाळता येऊ शकतील या गोष्टीकडे लक्ष द्यावे.