दुप्पट फायदा! गृह कर्जाच्या विम्यामूळे होणार दुप्पट फायदा; नाही राहणार गृहकर्ज फेडण्याचे टेन्शन..!

Home Loan Insurance: आजच्या काळामध्ये गृह कर्जाच्या माध्यमातून आपण आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न सहजपणे साकार करू शकतो. तुम्हाला हे माहीतच असेल की, तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गृह कर्ज विम्याच्या माध्यमातून सुरक्षित करू शकता. यामुळे आता तुम्ही नसतानाही गृह कर्जाची जी काही परतफेड असेल ती अगदी वेळेवर होऊ शकते (Home loan insurance plans). चला तर आपण गृह कर्जाच्या विमा बद्दल आजच्या लेखामध्ये आपण तपशील माहिती जाणून घेऊया.

मोठमोठ्या शहरांमध्ये स्वतःचे हक्काचे घर घेणे अतिशय अवघड झाले आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीचे हे एक स्वप्न असते की, छोटे का होईना पण आपले हक्काचे घर असावे. या स्वप्नाची पूर्तता करत असताना कित्येक नागरिक गृह कर्जाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडतात (Home loan insurance benefits). या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीला पैशांच्या कमतरतेमुळे स्वतःचे घर खरेदी करता येत नसेल तर अशावेळी ती व्यक्ती गृह कर्जाच्या माध्यमातून अगदी बिनधास्तपणे स्वतःचे घर खरेदी करू शकते.

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की, घडून येणारे अपघात हे अनयोजित असतात. अशावेळी जर तुम्ही गृह कर्ज घेतले असाल तर तुम्ही गृहकर्जाच्या विम्याचा नक्कीच लाभ घ्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, गृह कर्जाचा विमा हा इतर विमा सारखा असतो का? तर तसे नाही. गृह कर्जाचा विमा हा कौटुंबिक तसेच आरोग्य विमा पेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. आपण घेतलेले गृह कर्ज हेच सुनिश्चित करते की कर्ज धारकाचा मृत्यू झाला असेल तरीही कर्जाची जी काही रक्कम असेल ती वेळेवर परतफेड केली जाते. देशभरातील कित्येक नागरिकांना अजूनही गृह कर्ज विमा बद्दल माहित नाही. आज आपण हेच पाहूया की, गृह कर्जाचा विमा नक्की का घ्यावा? तसेच त्याचे काय फायदे आहेत?

खुशखबर! आता घर खरेदी करा आणि मिळवा ‘हे’ फायदे..ही चांगली संधी गमावू नका..

गृहकर्जाचा विमा घेणे बंधनकारक आहे का?

देशभरामध्ये गृह कर्ज विमा अजूनही अनिवार्य केला नाही. या बाबी आपण इच्छेनुसार करू शकतो. किती कंपन्या आहेत त्या गृह कर्जासोबत गृह कर्ज विमा चा लाभ ग्राहकांना देत आहेत. तसेच कित्येक लोक व्याजावर गृह कर्ज सोबतच कर्ज विमा घेत आहेत. गृह कर्जाच्या विमा मध्ये गृह कर्जाची परतफेड या ठिकाणी करायचे असेल तर कोणतीही समस्या उद्भवत नाही. समजा कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तरीही कर्जाची जी काही परतफेड असेल ती करता येते.

म्हाडाची घरे झाली स्वस्त! म्हाडा प्राधिकरणाने घेतला मोठा निर्णय..आता घराचे स्वप्न होईल साकार..

गृह कर्ज घेतले आहे. परंतु गृह कर्जाचा विमा घ्यायचा आहे की नाही ह्या गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहेत. तुम्ही जर गृह कर्जाचा विमा घेतला तर नक्कीच विविध कंपन्यांच्या माध्यमातून पॉलिसी प्रदान केली जाते. त्या पॉलिसींची तुलना करूनच आपल्याला फायदेशीर ठरणारी पॉलिसी निवडावी.

गृहकर्जाचा विमा का घ्यावा?

तुम्ही जी रक्कम गुंतवली आहे त्याचे संरक्षण गृह कर्जाचे विमा करते. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचा अपघाती किव्हा इतर कारणास्तव मृत्यू झाला असेल तर अशावेळी तुम्ही जे काही घेतलेले गृह कर्ज आहे ते वेळेवर परतफेड करता येते. यामध्ये तुम्हाला जो काही प्रीमियम असेल तो एकदाच भरावा लागेल. जर ग्राहकाला प्रीमियम जास्त वाटत असेल तर नक्कीच ग्राहक ईएमआय च्या माध्यमातून प्रीमियम भरू शकतात.

आयकर कायदा 1961 कलम 80 सी च्या माध्यमातून कर लाभ सुद्धा प्रदान करता येतो. तुम्ही ईएमआय च्या माध्यमातून प्रीमियम भरला तर तुम्हालाही अशावेळी कोणत्याही कराचा लाभ मिळत नाही. याचा अर्थ असा होतो की, जर तुम्हाला कर लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच एक रकमी प्रीमियम तुम्हाला भरावा लागणार आहे. अशावेळी तुम्हाला गृह कर्जाच्या विम्याचा लाभ घेता येतो.

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

इन्शुरन्स च्या माध्यमातून तुम्हाला विविध सुविधा मिळतात. या सुविधांचा लाभ घेऊन नक्कीच तुमचा विमा अगदी चांगल्या प्रकारे मजबूत करू शकता. हा विमा इतर कोणत्याही गंभीर आजाराच्या दरम्यान काम करू शकतो. गृह कर्ज विमा हा कर्जधारकाचे यासोबतच त्याच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी मदत करत आहे. या विम्यानंतर कर्जाची परतफेड करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे टेन्शन राहत नाही.

या गोष्टी लक्षात ठेवा-

गृह कर्ज विमा घेत असताना इतर कोणत्याही जीवन विमा कंपनीच्या माध्यमातून किंवा सामान्य विमा कंपनीच्या माध्यमातून घ्यावा.

सर्वसाधारणपणे विमा कंपनी प्रत्येक वर्षी तिच्या पॉलिसीचे नूतनीकरण करत आहे. अशावेळी कमी प्रीमियम भरावा लागतो.

दीर्घकालीन कव्हरेज मिळावा यासाठी पॉलिसीधारक व्यक्तीला जास्त प्रीमियम या ठिकाणी भरावा लागणार आहे.

बाप रे! आता 40 लाखांच्या खाली फ्लॅट खरेदी करणे अवघड होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

तुमचे गृह कर्ज जर तुम्हाला हस्तांतरित केले असेल तर अशावेळी गृह कर्ज विमा सुद्धा या ठिकाणी हस्तांतरित झाला आहे. याची खात्री करून घ्यावी.

तुमचे जे काही गृह कर्ज जास्त व्याजदरामुळे वाढत असेल तर तुमच्या कर्जाची रक्कम ही कव्हर करायची असेल तर गृह कर्ज विमा पुरेसा नसतो.

Leave a Comment