बाप रे! होम लोनच्या नादात घराच्या दुप्पट रक्कम भरताय? फक्त ‘हे’ काम करा आणि वसूल करा एक एक रुपया..

तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून (SBI) होम लोन (Home Loan) घेतले असेल तर अशावेळी हे संपूर्ण लोन फेडेपर्यंत दुप्पट रक्कम तुम्ही बँकेला देता. मग अशावेळी अतिरिक्त जी काही रक्कम असेल ती नक्की कशाप्रकारे रिकव्हर करायची? याविषयी आज आपण जाणून घेऊया..

आपले स्वतःचे अलिशान घर (Luxury Home) पाहिजे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरिकांना मोठी किंमतही मोजावी लागते. अशावेळी अनेक जण विविध बँकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या होम लोनचा (Home Loan) आधार घेतात. होम लोन घेऊन नक्कीच आपले स्वप्न सातत्यात उतरते. परंतु आपण जे लोन घेतले आहे त्या रकमेवरील व्याजदर वेळोवेळी फेडावे लागते. जर लोनची रक्कम जास्त असेल तर कित्येक जण वर्षांचा कालावधी सुद्धा वाढवतात.

मागील कित्येक वर्षांपासून महागाई जसजशी वाढत आहे त्याचप्रमाणे व्याजदरातही तितकीच वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. व्याजदरात वाढ झाल्यामुळे आपला लोनचा हप्ता वाढतो किंवा कार्यकाळ सुद्धा वाढतो. जर तुम्ही 30 लाखांचे लोन 20 वर्षांसाठी घेत असाल तर तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट इतकच व्याज द्यावे लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासाठी जवळपास दुप्पट पैसे मोजता. परंतु तुम्ही ठरवले तर एसआयपीच्या माध्यमातून लोनची ही रक्कम पूर्णपणे वसूल करता येते. त्यासाठी काय करावे लागेल? चला जाणून घेऊया.

येथे वाचा – याठिकाणी प्लॉट, घर आणि फ्लॅट खरेदी करा; भविष्यात दुप्पट रक्कम मिळण्याची शक्यता..!

होम लोनसाठी तुम्हाला नक्की किती व्याज भरावे लागेल हे आधी समजून घ्या;

समजा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून 30 लाखांचे लोन 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले असेल तर अशावेळी 9.55% व्याजदरासोबतच तुम्हाला सर्व मिळून 67 लाख 34 हजार 871 रुपये बँकेला द्यावे लागतील. म्हणजे तुमची जी काही प्रिन्सिपल अमाऊंट असेल ती 30 लाखांची आणि व्याज 37 लाख 34 हजार 871 रुपये इतके असेल. अशावेळी मासिक हप्ता तुमचा 28 हजार 062 रुपये इतका असेल. ते पण 9.55% व्याजदर संपूर्ण 30 वर्षासाठी असेल तरच यावरूनच तुम्हाला हे समजले असेल की, होम लोनसाठी आपल्याला कितपत मोठी रक्कम मोजावी लागत आहे. परंतु ही जी काही अतिरिक्त रक्कम आहे ती नक्की कशाप्रकारे वसूल करायची असा विचार नक्कीच तुमच्या मनात आला असेल. तर याविषयी समजून घेऊया.

अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; येथे क्लिक करून पहा माहिती..

अशाप्रकारे लोन करा रिकव्हर;

तुम्हाला जर लोन तसेच व्याजाची संपूर्ण रक्कम वसूल करायचे असेल तर अशावेळी म्युच्युअल फंड ‘SIP’ हा एक उत्कृष्ट पर्याय तुमच्यासमोर आहे. तुमच्या होम लोनच्या हप्त्यास सुरुवात होताच तुम्ही इतक्याच कालावधीसाठी मासिक SIP सुरू करा. तुमच्या लोनच्या मासिक हप्त्यावरच तुम्ही कितीची SIP सुरू करायची हे अवलंबून असेल. तुम्ही तुमच्या 20% ते 25% SIP केली तर होम लोनच्या अगदी शेवटी तुम्ही बँकेला जेवढे पैसे देत आहात तेवढे पैसे तुम्ही मिळवू शकणार आहे. ते कसे तर चला हे पण समजून घेऊया..

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

  • होम लोनचं गणित कसं असेल?

1) एकूण होम लोन: 30 लाख रुपये

2) कार्यकाळ: 20 वर्षं

3) व्याज दर: वार्षिक 9.55 टक्के

4) ईएमआय: 28,062 रुपये

5) लोनवरील एकूण व्याजः 37,34,871 रुपये

6) लोनपोटी एकूण पेमेंट: 67,34,871 रुपये

  • SIP चे गणित?
  • SIP रक्कम: EMI च्या 25% (7,015 रुपये)
  • गुंतवणूक कालावधी: 20 वर्षं
  • अंदाजे परतावा: 12% प्रतिवर्ष
  • 20 वर्षानंतर एसआयपी (SIP) मूल्य: 70 लाख 9 हजार 23 रुपया

Leave a Comment