2 bhk flat Navi Mumbai : नवी मुंबईमधील रिअल इस्टेटच्या किमती प्रचंड वाढल्या असून प्रति चौरस फुटासाठी आता 40 हजार रूपये मोजावे लागत आहे. पाम बीचवर असलेल्या NRI सीवूड्समधील 2 BHK घरासाठी 4 कोटी रुपये मोजावी लागत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच सिडकोचे हस्तांतरण शुल्क सुद्धा 40 लाख रुपये एवढे आहे. याला दुजोरा देत रियल्टर्स फोरम क्रेडाइ-एमसीएचआय -नवी मुंबईचे वरीष्ठ उपाध्यक्ष मनोहर श्रॉफ असे म्हणाले की, शहरामधील रिअल इस्टेटच्या (Real Estate Navi Mumbai) किंमती आता अमिताभ बच्चन यांच्या शेजारच्या परिसरा इतक्या झाल्या आहेत. श्रॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार नेरुळमध्ये पाम बीच मार्गाजवळ असलेल्या एका सोसायटीत सहा-बीएचके ड्युप्लेक्सची तब्बल 34 कोटी रुपयांना विक्री झाल्याची माहिती आहे..
2 bhk flat Navi Mumbai
“सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी तसेच सर्व ठिकाणी सुरु असलेला संरचनात्मक विकास इत्यादी सारख्या घटकांमूळे दर्जेदार जीवनशैली असणारी घरे उपलब्ध करुन देत असल्याने रिअल इस्टेटच्या किमतींत वाढ झालेली आहे,” अशी माहिती म्हणाले त्यांनी दिली. सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (MTHL) काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तसेच सरकार देखील एमटीएचएलला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासोबत जोडण्याच्या तयारीत आहे. “पाम बीच रोड हाय स्ट्रीट रिटेल, करमणूक आणि दर्जेदार शिक्षण तसेच वैद्यकीय सुविधांसारख्या सर्वोत्तम प्रगत संरचनांनी सज्ज आहे,” अशी माहिती मिळाली आहे..
मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!
महत्वाच्या संस्थांद्वारे संचालन होणारी कॉलेज आणि प्रसिद्ध विद्यापीठे याठिकाणी असल्याने हा भाग महाराष्ट्राची उच्च शैक्षणिक राजधानी म्हणून दिवसेंदिवस ओळखले जात आहे. तसेच याठिकाणी भव्य मॉल्स आणि मल्टिप्लेक्सेस तसेच ख्यातनाम ज्वेलरी ब्रॅंड्सची आउटलेट्स देखील दिसतात. नेरुळमध्ये पाम बीच रोड नजीक असलेल्या भूखंडाच्या किंमतीत वाढ होऊन जुलै 2021 मध्ये 6.72 लाख रुपये चौरस मीटर एवढी झाली होती, तर आता सिडकोची (Cidco) आधारभूत किंमतच 1.04 लाख रुपये चौरस मीटर पेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. घणसोलीमध्ये मागील वर्षी जूनमध्ये एका रहिवासी आणि व्यावसायिक भूखंडाची (Plot) विक्री 3 लाख रुपये प्रति चौरस मीटर अशा किमतीला झाली होती.