मुंबईत फक्त 18 लाखात घर; हाय वे शेजारी बजेटमध्ये घर, पहा सॅम्पल फ्लॅट..!

Affordable Flats Mumbai : मुंबईत दर दिवसाला घरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. यात अलिशान घरे आणि सामान्यांना परवडणारी घरे दोन्हीचा समावेश असतो. मुंबईत रोजगार व व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याने येथे घरांची मोठी मागणी आहे. त्यामुळे मुंबईत घरांचे दर (Flats Rates Mumbai) देखील प्रचंड वाढलेले आहेत. पण मुंबईत असे देखील काही परिसर आहेत जेथे घरांचे दर सामान्यांना परवडणारे आहेत. सामान्य माणूस सहज घर खरेदी करू शकतो. मुंबईत ही परवडणारी घरे कुठे आहेत? आणि त्यांची किंमत किती आहे? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मुंबईत घरांची मोठी विक्री

मुंबईत पॉश भागात घरांच्या किंमती आभाळाला टेकल्या आहेत. अलीकडेच मुंबईतील वांद्रे पाली हिल (Pali Hill Mumbai) परिसरामध्ये घरांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे. मुंबईतील वांद्रे पाली हिल हा पॉश परिसर आहे आणि या परिसरात बॉलिवूडमधील नामवंत कलाकार यांचे निवासस्थाने असल्याने या परिसरात अलिशान घरे आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये याठिकाणी 39 अलिशान घरांची (Luxury Home Mumbai) विक्री झाली आहे. वांद्रे पाली हिल परिसरातील घरांचे हे व्यवहार 500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाली हिल परिसरात 2023 या वर्षात 80 हजार रुपये प्रती चौरस फूट या दराने प्रथमच विक्रमी दर गाठला आहे. मुंबईमधील अन्य परिसराच्या तुलनेत या एका छोट्याशा परिसरात तब्बल 500 कोटी रुपयांची विक्रमी विक्री झाली असल्याचं मानलं जात आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

मुंबईत परवडणाऱ्या घरांसोबत अलिशान घरांना देखील मोठी मागणी असल्याचं यातून आपल्याला दिसून येतं. मुंबईत पाहिजे त्या ठिकाणी घर घ्यायचे झाल्यास तुम्हाला जास्तीचा पैसा मोजावा लागेल. पण जर तुम्हाला मुंबईत परवडणाऱ्या दरात घर खरेदी करायचे असेल तर थोडी तडजोड तुम्हाला करावी लागेल. आजही मुंबईत काही ठिकाणी परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध होत आहे. चला कुठे मिळेल? हे जाणून घेऊया..

मुंबईकरांनो! आता मुंबईत 35 लाखांचे घर अवघ्या 27 लाखांत उपलब्ध होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

याठिकाणी फक्त 18 लाखात घर (Affordable Flats Mumbai)

नवी मुंबईतील पनवेलमध्ये तुम्हाला 18 ते 19 लाखात एक चांगले घर (Affordable Flats Panvel) खरेदी करता येणार आहे. हा प्रोजेक्ट खासगी बिल्डरचा असून व्हाईट कॉलर बिजनेस यांनी या प्रॉपर्टीवर व्हिडिओ बनवला आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रोजेक्ट पासून हाय वे फक्त 30 सेकंडच्या अंतरावर आहे. त्यामुळे येथे तुम्हाला रस्त्याची चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. येथे जवळचं म्हणजेच दोन मिनिटाच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आहे आणि शाळा देखील आहे. या परिसरात विद्यार्थी भाड्याने घर शोधत असतात. त्यामुळे येथील प्रॉपर्टीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

मुंबईत स्वस्तात घर घ्यायचे असेल तर ही ट्रिक लक्षात ठेवा; मिळेल खूपच स्वस्तात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

या प्रोजेक्ट पासून फक्त 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ असून या विमानतळाचं काम सध्या सुरू आहे. ही प्रॉपर्टी नवी मुंबईतील पनवेलमध्ये (Property in Panvel) आहे. या घरांच्या किंमती त्याच्या क्षेत्रफळानुसार आहे. या प्रोजेक्टमधील घरांच्या किंमती जर पाहिल्या तर वन आर.के फ्लॅट 18 लाख रुपयांपर्यंत मिळत आहे. वन बीएचके फ्लॅट (1 BHK flat Panvel) हा 27 लाखांपर्यन्त आहे. तसेच 2 बीएचके फ्लॅट (2 BHK flat Panvel) हा 43 लाख रुपयांपर्यंत असल्याची माहिती व्हिडिओतून मिळाली आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा..

3 thoughts on “मुंबईत फक्त 18 लाखात घर; हाय वे शेजारी बजेटमध्ये घर, पहा सॅम्पल फ्लॅट..!”

Leave a Comment