मोठी बातमी! याठिकाणी घरांच्या किंमती झाल्या कमी; आता येथे मिळेल स्वस्तात घर, पहा कुठे?

1 BHK Flat : मुंबई – पुण्यासारख्या शहरात गेल्या काही महिन्यांपासून रिअल इस्टेट (Real Estate Mumbai) क्षेत्रात मोठी तेजी आली आहे. त्यामुळे देशामधील अनेक मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट, घरे (1 BHK Flat) महाग झाली आहेत. कोविडच्या संकटानंतर देशामधील प्रॉपर्टीच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. दिल्ली तसेच देशामधील अनेक शहरांमध्ये घर विकत घेणे खूपच महाग झाले आहे. पण आता काही शहरांमध्ये घर विकत घेणे खूप स्वस्त झाले आहे. म्हणजेच काही शहरांमध्ये घरांच्या किंमती कमी झाल्या आहेत. नेमक्या कोणत्या शहरात घरांच्या किंमती कमी झाल्या हे आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत.

रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या जून तिमाहीच्या आकडेवारीत देशातील घरांच्या किंमती (Flat Price) वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहेत. या तिमाहीमध्ये ऑल इंडिया होम प्राइस इंडेक्स (HPI) मध्ये 5.1 टक्के एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे, जी वाढून 311.9 एवढी झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीमध्ये होम प्राइस इंडेक्स 296.6 एवढा होता. चला तर मग जाणून घेऊया घराच्या किंमती कुठे वाढल्या आणि कुठे कमी झाल्या?..

काय सांगता! अवघ्या 300 रुपयात घर; येथे क्लिक करून पहा व्हायरल बातमी..!

येथे वाढल्या घरांच्या किमती (1 BHK Flat Mumbai)

इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या अहवालानुसार दिल्ली शहरात घरांच्या किंमती सर्वात जास्त वाढल्या आहेत. जून 2023 या तिमाहीमध्ये देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये HPI मध्ये 14.9 टक्के एवढी वाढ नोंदवली गेली आहे. या यादीमध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली पाठोपाठ मुंबईमध्ये घरांच्या किंमतीत सर्वात जास्त वाढ झाली आहेत.

आता मोठी संधी! स्वस्तात घ्या म्हाडाचे घर; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बेंगळुरूमध्ये गेल्या वर्षभरामध्ये घरांच्या किंमती (Flat Price) 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या यादीमध्ये लखनौ शहर चौथ्या क्रमांकावर आहे. लखनौतील घरांच्या किंमतीमध्ये प्रतेकवर्षी 4.5 टक्के एवढी वाढ झाली आहे. मागील तिमाहीच्या तुलनेमध्ये कानपूरात 2.5 टक्के तर चेन्नई शहरात 2 टक्क्यांनी घरांच्या किंमती वाढल्या आहेत.

‘या’ शहरातील घरांच्या किंमती झाल्या कमी (1 BHK Flat)

मुंबई, चेन्नई आणि दिल्ली या शहरांमध्ये घरांच्या किंमती वाढल्या आहेत, तर दुसरीकडे कोलकात्यात घरांच्या किंमतीमध्ये चांगलीच घट झाली आहे. मागील वर्षभरामध्ये घरांच्या किंमतींमध्ये 6.6 टक्के एवढी मोठी घसरण झाली आहे. कोलकाता येथे घरांच्या किंमती स्वस्त झाल्या आहेत. तसेच अहमदाबादमध्ये देखील घरांच्या किंमती 2.1 टक्क्यांनी स्वस्त (Cheap Flat) झाल्या आहेत.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

Leave a Comment