प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर पाहिजे का? तर मग हे नियम तुम्हाला माहिती पाहिजे..

PM Awas Housing Scheme : राज्य सरकार तसेच केंद्र सरकार देशातील आर्थिक स्थिती खराब असलेल्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे. देशात असे असंख्य लोक आहे की ज्यांच्याकडे राहण्यासाठी पक्के घर नाही. अशा लोकांना झोपडपट्टीत तसेच पत्राच्या कच्च्या घरात राहावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारकडून एक जबरदस्त योजना चालविली जात आहे. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana). देशभरातील लाखो लोक सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करत आहे..

प्रधानमंत्री आवास योजना या गृह योजनेच्या माध्यमातून (Housing Scheme) सरकारकडून गरीब परिस्थिती असलेल्या लोकांना नवीन घरासाठी तसेच घर बांधण्यासाठी आर्थिक सहकार्य केले जाते. जर तुम्हालाही सरकाराच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून नवीन पक्क्या घरासाठी पैसा मिळवायचा असेल तर या योजनेबाबत काही महत्वाची आणि उपयोगाची माहिती तुम्हाला पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया या गृह योजनेबाबत (Housing Scheme) महत्वाची माहिती..

सरकारकडून घर कोणाला मिळणार?

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तेच लोक अर्ज करू शकतात, ज्यांच्याकडे आपले स्वतःचे पक्के घर नाहीये. जर तुम्हाला या सरकारी योजनेतून घर घ्यायचे असेल आणि तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी करत असेल तर अशा परिस्थितीत गृह योजनेचा लाभ मिळणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे EWS आणि LIG कॅटेगरीमधील कुटुंबाच्या प्रमुखांना या योजनेचा लाभ मिळतो. जर तुम्ही EWS कॅटेगरी मधून येत असाल तर तुमची वार्षिक इन्कम 3 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

प्रधानमंत्री आवास योजना या गृह योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे काही महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला, रेशन कार्ड, बँक अकाऊंट आणि मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे येतात.

Leave a Comment