Housing scheme : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) मे महिन्यापासून आतपर्यंत रेपो दर (Repo rate) चार वेळा वाढवले आहे. परिणामी होम लोनसह (Home loan) बाकी इयर सगळे लोन पूर्वीपेक्षा महाग झाली आहेत. घर बांधण्यासाठी बँकेकडून मोठी रक्कम लोन म्हणून मिळते. या लोनचा परतफेडीचा कालावधी देखील मोठा असतो. सरासरी हा कालावधी 15 वर्षांपेक्षा अधिक असतो. इतर लोनपेक्षा होम लोनची रक्कम तसेच कालावधी हा जास्त असतो. जर का होम लोनच्या व्याजदरात थोडी जरी वाढ झाली तर आपले पूर्ण बजेट बिघडण्याची शक्यता असते. Housing scheme.
येथे वाचा – मोठी बातमी : स्वस्तात घर घेण्याची सुवर्णसंधी! याठिकाणी 5915 घरांसाठी मोठी लॉटरी, जाणून घ्या..!
Cheapest Home Loan
अलीकडेच रेपो दरात (Repo Rates) 190 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आलेली आहे. ही वाढणारी महागाई लक्षात घेऊन या रेपो दरात अजून वाढ होऊ शकते. त्यामुळे होम लोनच्या व्याज दरात अजून वाढ होऊ शकते, असं जाणकार लोक सांगत आहे. त्यासाठी हे सतत वाढणारे व्याजदर लक्षात घेता आपल्याला कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देईल अशा बॅंका माहिती पाहिजे. आणि अशा बॅंकांमधून होम लोन घेतल्यास आपल्याला कमी व्याजदर द्यावा लागेल.. चला तर मग जाणून घेऊया कमी व्याजदरावर होम लोन देणार्या बॅंकांबद्दल…