खुशखबर! आता या लोकांना मिळणार घरकूल; सरकारने घरकुलास दिली मान्यता, पहा कोणाला मिळणार लाभ?

Housing Schemes : सर्वसामान्य आणि गरीब, दुर्बल नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून बर्‍याच योजना सुरू करण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या घटकाकडे राहण्यासाठी सिमेंट काँक्रीटची घरे म्हणजेच पक्की घरे नसतात. त्यामूळे सामान्य – गोरगरिबांना झोपडपट्टी किंवा मातीच्या घरांमध्ये रहावे लागते. पावसाळ्या या लोकांना अनेक समस्या येत असतात. घरामध्ये पाणी गळणे, वार्‍यामूळे घरावरची पत्रे-छत उडून जाणे तसेच अवकाळीमूळे घर कोसळणे अशा कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्यामूळे त्यांना पक्की घरे बांधणे शक्य होत नाही.

पण अशा गरिबांसाठी पक्की घरे बांधण्यासाठी सरकारकडून विविध गृह योजना (Housing Scheme) राबवल्या जात आहे. त्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना यासारख्या योजना सरकार राबवत आहे. आता सामान्य लोकांसाठी एक मोठी बातमी आली आहे, सरकारकडून 1049 एवढ्या लाभार्थ्यांच्या घरकुल (Gharkul) प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. सरकारकडून मान्यता मिळालेल्या या घरकूलांचा लाभ नेमक्या कोणत्या जिल्ह्याला मिळणार? आणि कोणत्या लोकांना मिळणार? याची माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

या जिल्ह्यातील या लोकांना मिळणार घरकूल

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल ‌योजनेअंतर्गत 2023-24 या वर्षासाठी 1049 एवढ्या लाभार्थ्यांच्या घरकुल प्रस्तावास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (विजाभज) प्रवर्गामधील लाभार्थ्यांना या घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

काय सांगता! म्हाडाच्या या घरांना प्रतिसाद वाढला; या स्वस्त घरांसाठी लवकर करा अर्ज, येथे क्लिक करून पहा बातमी..

सरकारच्या इतर मागास बहुजन विभागाकडून विजाभज प्रवर्गामधील वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी रमाई आवास योजनेच्या धर्तीवर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राबविलीग जात आहे. या घरकुल बांधकामासाठी प्रति लाभार्थ्याला 1 लाख 20 रुपये यानुसार 1049 एवढ्या लाभार्थ्यांसाठी 12 कोटी 58 लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. यातील 3 कोटी 28 लाख रुपये एवढा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुंबईकरांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट; म्हाडा संदर्भात सरकारची मोठी घोषणा, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment