महत्वाची बातमी : पीएम किसान योजनेची eKYC झाली की नाही अशी करा मोबाईल वरून चेक, येथे लिंक उपलब्ध..!

मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना eKYC करने बंधनकारक आहे. आतापर्यंत सरकारने पीएम किसान योजनेचे दहा हप्ते शेतकर्‍यांच्या खात्यात यशस्वीरित्या हस्तांतरित केलेले आहे. आता शेतकरी 11 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. पण पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते त्याच शेतकर्‍यांना मिळतील ज्यांनी eKYC पूर्ण केलेली आहे.

बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न..!

येथे करा eKYC

बर्‍याच शेतकर्‍यांना eKYC काय आहे? आणि ती कशी करावी हेच माहीत नाही. अशा शेतकर्‍यांनी आपल्या गावातील CSC सेंटरला भेट देऊन eKYC पूर्ण करून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल ते घरी बसून आपल्या मोबाईल वरून देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला https://pmkisan.gov.in/aadharekyc.aspx या लिंक वर क्लिक करून आपली माहिती भरावी लागेल. ही सर्व प्रक्रिया खूप सोपी असल्यामूळे कोणीही करू शकतो.

eKYC झाली की नाही अशी करा चेक

काही शेतकर्‍यांनी eKYC केलेली आहे पण ती यशस्वीरित्या पूर्ण झाली की नाही? असा संशय त्यांना आहे, अशा शेतकर्‍यांनी आपल्या मोबाईल वरून eKYC स्टेटस चेक करून घ्यावे. त्यासाठी https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx या दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर आपला आधार नंबर टाकून ‘Get Data’ या बटणावर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला ‘Payment mode’ दिसेल. त्यासमोर जर Adhar लिहीलेलं असेल तर तुमची eKYC पूर्ण झालेली आहे.

Leave a Comment