उन्हाळी सोयाबीनने दिला धोका; शेतकरी म्हणतात “उन्हाळी सोयाबीनची पेरणी करताना जरा विचार करा”

Read Marathi Online : यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्यामूळे शेतकर्‍यांनी उन्हाळ्यात पीक घेण्यासाठी सोयाबीनला पसंती दिली आणि पेरणी मोठ्या उत्साहात केली. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चही केला. पण सोयाबीनने शेतकर्‍यांना मोठा धोका दिल्याचं अलीकडे समोर येऊ लागलं आहेत. उन्हाळी सोयाबीनला मालधारणा होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. (Huge losses to farmers due to summer soybeans, The Farmers say “think carefully when sowing summer soybeans”)..

उन्हाळी सोयाबीनमूळे शेतकर्‍यांचं मोठ आर्थिक नुकसान तर झालंच पण त्यासोबतच येणार्‍या खरीप हंगामात बियाणांसाठी शेतकर्‍यांची आता धावपळ होण्याची शक्यता आहे. कारण उन्हाळी सोयाबीनच्या भरोश्यावर शेतकर्‍यांनी पेरणीसाठी खरिपातील सोयाबीनचा एकही दाना ठेवलेला नाही. उन्हाळ्यात घेतली जाणारी उन्हाळी सोयाबीन विशेषकरून खरिपातील बियाणांसाठी घेतली जाते. त्यामूळे बियाणांसाठी यावर्षी अधिकचे पैसे शेतकर्‍यांना मोजावे लागू शकतात.

शेतकरी म्हणतात “सोयाबीनला शेंगाच नाही”

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या शिवना गावातील प्रतिष्ठित व्यापारी व शेतकरी विशु पाटील काळे यांनी डिसेंबर महिन्यात आपल्या 2 एकर बागायती क्षेत्रात फुले संगम सोयाबीनची लागवड केली होती. एप्रिल महिना अर्धा संपत आला तरी सोयाबीनला एकही शेंग दिसत नसल्याने ते हैराण झाले..

हे पण वाचा – बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या बकर्‍या

पेरणी करून जवळपास 4 महिने उलटले असले तरी मालधारणा होत नसल्याने उन्हाळी सोयाबीनवर रोष व्यक्त करत विशु पाटील काळे यांनी आपल्या 2 एकर उभ्या सोयाबीनमध्ये चक्क बकर्‍या चरायला सोडल्या आहेत. “उन्हाळी सोयाबीनची पेरणी करताना जरा विचार करा” असा संदेश देखील त्यांनी सोशल मीडिया वर शेअर केला आहे..

उन्हाळी सोयाबीन चे उत्पादन घटनार

राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाढते तापमान व उन्हामुळे सोयाबीनची फुल गळती होत आहे. त्यामूळे शेतकर्‍यांच्या हातात काहीच पडणार नसल्याच चित्र आता समोर येऊ लागलं आहेत. याचाच परिणाम म्हणून उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे पण वाचा – बाप रे !  या शेतकर्‍याने आपल्या 5 एकरात 75 दिवसांमध्ये घेतले तब्बल 13 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

2 thoughts on “उन्हाळी सोयाबीनने दिला धोका; शेतकरी म्हणतात “उन्हाळी सोयाबीनची पेरणी करताना जरा विचार करा””

  1. पाण्याचं प्रमाण अधिक असल्याने त्या झाडांना फळ धारणा होत नाही. फुल धारणा होत असताना पाणी टप्पा लेट द्या. मग 50 % फुल धारणा झाल्यावर पाणी चालू करावा.

    Reply
  2. हो दादा मी पण भरपूर ठिकाणी बघितले लोकांनी सोयाबीन तुषार सिंचनाच्या साहाय्याने सारखे पाणी चालूच ठेवले. पान ज्या शेतकऱ्यांनी ड्रीप वरती लागवड केली ते शेतकरी आज यशस्वी आहे.

    Reply

Leave a Comment