मी कधीच लग्न करणार नाही; तुषार कपूर..!

मुंबई : बॉलिवूड मध्ये असे अनेक अभिनेते आहेत की ज्यांनी अजून पर्यंत लग्न केलेले नाही. या विषया संबंधी मीडिया मध्ये सर्वात जास्त चर्चा सलमान खान बद्दल केली जाते. पण बॉलिवूड मध्ये अजून असे अनेक अभिनेते आहे ज्यांनी सलमान खान यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. असाच एक बॉलिवूडमधील अभिनेता आहे ज्याचे नाव आहे तुशार कपूर.

आज आपन तुशार कपूर यांनी दिलेल्या एका मुलाखती बद्दल माहिती घेणार आहोत. तुशार कपूरने मुलाखतीत बोलतांना “मी कधीच लग्न करणार नाही, माझा विचार ठाम आहे. स्वतःला कोणासोबत शेअर करायची इच्छा नाही. माझा लग्न करण्याचा विचार असता तर मी सिंगल पेरेंट झालोच नसतो” असा खुलासा केला आहे. मीडिया ने त्यांना लग्ना संदर्भात विचारणा केली असता तुशार कपूरने असे उत्तर दिले आहे. जून 2016 मध्ये सरोगसी द्वारे तुशार कपूर पिता झाला आहे, तुशार कपूर च्या मागोमाग त्याच्या बहीणीने देखील सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिला आहे. त्याची बहीण एकता कपूर अजून अविवाहित आहे. अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर हे तुशार कपूर चे आई वडील आहे.

तुशार कपूरचे वय सध्या 44 आहे. “मुझे कुछ कहेना है” हा तुशार कपूरचा पहिला सिनेमा आहे. 2001 मध्ये या सिनेमाच्या माध्यमातून तुशार कपूरने आपल्या करिअर ला सुरवात केली. गायब, कुछ तो है, कूल है हम, खाकी या सिनेमांमधून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. गोलमाल मध्ये केलेला मुका रोल प्रेक्षकांना खुपच आवडला.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment