…असं झालं तर कांद्याचे भाव वाढतील, पहा काय म्हणतात जाणकार..!

यावर्षी कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे त्यातुलनेत कांद्याची विदेशात निर्यात होत नसल्याने बाजार भाव खूपच कोसळले आहे. बाजारा मध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. लाल कांद्याच्या पाठोपाठ आता उन्हाळ कांद्याचीही आवक सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही बाजार समित्यांनी मार्च एंड च्या नावाखाली लिलाव बंद ठेवले आहे. त्यामूळे काही दिवस जमा झालेला कांदा एकदमच बाजारात दाखल होणार आहे. त्यामूळे भाव अजूनच कोसळतील असा अंदाज आहे. (If that happens then onion prices will go up, See what experts say)…

कांदा भाव घसरणीमागे अजून एक कारण आहे ते म्हणजे कांद्याची विदेशात होणारी निर्यात ठप्प झाली आहे. कांद्याची निर्यात करत असताना गाडी भाडे मोठ्या प्रमाणात मोजावे लागत असल्यामूळे निर्यातदार व्यापारी वर्गाने कांदा निर्यात करण्यासाठी हात आखडते घेतले आहे. कांदा विदेशात निर्यात होत नसल्यामुळे देशातील कांद्याची मागणी घटली आहे. याचा परिणाम बाजार भावांवर झाला असून कांदा कवडीमोल विकला जात आहे. अवकाळी पाऊस व गारपीट, कांद्याचे विक्रमी उत्पादन, विदेशात होणारी निर्यात ठप्प या सर्व गोष्टी कांदा दरांवर परिणाम करत आहे.

येथे पहाआजचे कांदा बाजार भाव

…असं झालं तर कांद्याचे भाव वाढतील

भारतातून विदेशात होणारी कांद्याची निर्यात सुरळीत होण्यासाठी काही कांदा व्यापाऱ्यांनी कांदा निर्यातीसाठी 10 टक्के अनुदान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. जर केंद्र सरकारने याकडे लक्ष देऊन निर्यातीचा प्रश्न जर मार्गी लावला तर कांद्याची निर्यात सुरळीत होण्यास मदत होईल आणि कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसतील असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे..

हे पण वाचाबाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

शेतमालाचे ताजे बाजार भाव, हवामान अंदाज, कृषी योजना व शेती विषयक सर्व माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

Leave a Reply

Your email address will not be published.