सावधान ! मोबाइल मध्ये हे अॅप जर इंस्टाॅल असेल तर मोबाइल मधील सर्व माहिती होऊ शकते चोरी…!

तंत्रज्ञान दिवसेंदिवस खुप बदलत आहे. नवनवीन टेक्नोलॉजी रोज मार्केट मध्ये येत आहे. पण ज्या प्रमाणे चांगल्या सुविधा देणाऱ्या गोष्टी उदयास येतात तेव्हा त्या अडचणी सुध्दा सोबत आणत असतात.

मोबाइल या टेक्नोलॉजी बद्दल आपन चर्चा करणार आहोत. दिसायला खुप छोटी वाटणारी ही वस्तू खुप मोठ-मोठे काम काही सेकंदात करुन टाकते. त्यामुळे त्याचे महत्व देखील खुप आहे. काही वर्षांपुर्वी खुप विरळ ठिकाणी दिसणारी ही टेक्नोलॉजी आज घरा-घरात पोहोचली आहे. मोबाइल ने प्रतेकाचे आयुष्य खुप सुखकर बनवले आहे. खुप सारे काम एकाच वस्तूचा वापर करुन होत असल्यामुळे जनू त्याचे प्रतेकाला व्यसनच लागले आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

पण मोबाइल नावाची टेक्नोलॉजी वापरत असतांना काही काळजी घेणे महत्वाचे ठरते. मोबाइल वर आपन सोशल मीडिया वर नेहमी सक्रिय असतो. सोशल मीडिया चा वापर करत असतांना आपल्याला मित्रांकडून वेगवेगळ्या लिंक येत असतात. ते सुध्दा पैशांच्या आमिषाला बळी पडून पुढे पाठवत असतात. पण त्यांना त्यापासून उद्भवणाऱ्या धोक्याची कल्पना नसते. त्यासाठी पैशांचे आमिष दाखवणाऱ्या लिंक आणि अॅप पासून सावधान रहायला पाहिजेत.

The best selling smart phone

सध्या मोबाइल वर fake update install नावाचे मालवेअर खुप फिरत आहे. अश्या प्रकारचे अॅप इंस्टाॅल केल्यामुळे मोबाइल मधील सर्व माहिती चोरी होण्याची दाट शक्यता असते. Checking for update नावाचा ऑप्शन मोबाइलच्या डिस्प्ले वर दिसत असल्यामुळे आपल्याला मोबाइल अपडेट वर आल्याचा समज होतो आणि आपन त्याला आपल्या मोबाइल मध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी देतो. आणि आपल्या मोबाइल चे सर्व कंट्रोल हॅकर च्या हातात जाते. यापासून वाचण्यासाठी पैशांचे आमिष दाखवणाऱ्या असुरक्षित लिंक वर क्लिक करु नये. अश्या प्रकारच्या fake update ऑप्शन वर
खात्री केल्याशिवाय क्लिक करु नये.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment