शेतकरी बांधवांनो सावधान ! बियाणे खरेदी करताना ‘ही’ चूक केल्यास कृषी विभागही तुमची मदत करू शकत नाही..!

शेअर करा

Read Marathi Online : शेतकरी राजा बर्‍याच दिवसांपासून ज्या वेळेची वाट पाहत आहे तो खरीप हंगाम जवळ आला आहे आणि अशातच आता शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदीला सुरवात केलेली आहे. लवकरात लवकर यशस्वी पेरणी करून मोकळे व्हायचं असं प्रतेक शेतकर्‍याला वाटत असतं. पण असं करत असताना आपण एका गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. (If you make ‘this’ mistake while buying seeds, even the Department of Agriculture cannot help you ..!)

शेतकरी बांधव खरीप तोंडावर आला की बियाणे आणि खते दुकानातून खूपच घाईगडबडीने विकत आणत असतात. हे सर्व करत असताना काय काळजी घ्यावी हे बहुतांश शेतकर्‍यांना माहिती नसतं आणि मग शेतकरी बांधवांच्या बियाण्यांबाबत तक्रारी यायला लागतात.

घाईघाईत पेरणी उरकून टाकल्यानंतर शेतकरी वाट पाहतात ती पीक उगवण्याची. मात्र, बहुतांश शेतकर्‍यांची फसवणूक झालेली असते. दुकानदारांनी त्यांच्या अधिकच्या नफ्यासाठी त्यांच्याकडे असेल ते बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारलेले असते.

येथे वाचा – कापूस उत्पादक शेतकरी होणार मालामाल, यंदाही कापसाचे भाव तेजीतच राहण्याची शक्यता..!

बियाण्यांची खात्री नसल्यामुळे आणि बनावट बियाणे खरेदी झाल्यामूळे शेतकर्‍यांच्या शेतातील पीक उगवत नाही किंवा उगवले तरी त्याला फळधारणा होत नाही. यामुळे शेतकर्‍यांचा वेळ आणि पैसा तर जातोच पुन्हा दुबार पेरणीचे संकट निर्माण होते. असे होऊ नये म्हणून कृषी विभाग सतत प्रयत्न करत असतो. पण आपल्या काही चुकांमूळे कृषी विभागालाही बणावट बियाणे विकणार्‍या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करता येत नाही. त्यासाठी बियाणे, खते विकत आणत असताना काय काळजी घेतली पाहिजे? हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असायला हवं..

बियाणे खरेदी करताना ‘या’ चुका करू नका…

बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर गेल्या नंतर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या आहे. बियाणे ओरिजिनल कंपनीचे आहे का? याची दुकानावरच खात्री करून घ्या. बियाणे विकत घेत असताना कृषी सेवा चालकाला दुकान नोंदणी क्रमांक असलेली पक्की पावती मागा. साधे बिल पावती दुकानदार देत असेल तर बियाणे घेऊ नका. बियाणांच्या पॅकिंग वजनाची खात्री करून घ्या.

काही शेतकरी उधारी वर व्यवहार करत असतात. अशा शेतकर्‍यांना मात्र नाईलाजाने साधे बिल घ्यावे लागते. फसवणूक झालेल्या शेतकर्‍याकडे पक्की पावती असेल तर कृषी विभागाला फसवणूक झालेल्या शेतकर्‍याला न्याय मिळून देण्यास अडचणी येत नाही.

शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

One thought on “शेतकरी बांधवांनो सावधान ! बियाणे खरेदी करताना ‘ही’ चूक केल्यास कृषी विभागही तुमची मदत करू शकत नाही..!

  • May 27, 2022 at 3:48 pm
    Permalink

    खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.