शेतकर्‍यांनो! 2 हजार रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर लगेच आपल्या मोबाईल वरून करा eKYC, येथे लिंक उपलब्ध..!

मित्रांनो, PM किसान योजनेचे तुम्ही जर लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे वर्षाला 6 हजार रुपये मिळतात अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने आता eKYC करणे बंधनकारक केली आहे. (If you want to get an installment of two thousand rupees, do e-KYC immediately)…

बर्‍याच शेतकर्‍यांना eKYC नेमकं काय आहे? हेच माहीत नाही. त्यामूळे अजून मोठ्या प्रमाणात eKYC पूर्ण व्हायच्या बाकी आहे, गेल्या काही दिवसांपासून शेतकरी PM किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन eKYC करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या समोर बर्‍याच अडचणी येत होत्या त्यामूळे शेतकरी बांधवांसमोर गोंधळ निर्माण झाला होता. बर्‍याच शेतकर्‍यांना OTP चा एरर येत असल्यामूळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाहीये त्यामूळे शेतकर्‍यांसमोर ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्थिती निर्माण झाली होती.

आता eKYC पुन्हा सुरू

आता परत एकदा eKYC सुरू करण्यात आलेली आहे, eKYC करताना येणार्‍या अडचणी दूर करण्यात आलेल्या आहे, अलीकडे अनेक शेतकरी बांधवांच्या eKYC यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही देखील खाली दिलेली योजनेची अधिकृत लिंक वापरून आपल्या मोबाइल वरून घर बसल्या ही eKYC पूर्ण करू शकता. त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील? अशी पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिलेली आहे त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा …

eKYC करण्याची शेवटची तारीख वाढवली

PM किसान योजनेसाठी 31 मार्चच्या अगोदर eKYC करणे सरकारने बंधनकारक केले होते. पण आता शेवटची तारीख 31 मे करण्यात आलेली आहे. त्यामूळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा

eKYC पूर्ण करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक

आपल्या मोबाइल वरून ही प्रक्रिया पूर्ण करत असताना तुमच्याकडे आधार कार्ड आणि आधार कार्डला रजिस्टर मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला आपल्या मोबाइल वरून eKYC पूर्ण करता येईल…

आपल्या मोबाइल वरून अशी करा eKYC, येथे लिंक उपलब्ध

(1)  सर्वात अगोदर आपल्या मोबाईल मध्ये https://pmkisan.gov.in/aadharekyc.aspx ही योजनेची अधिकृत लिंक उघडा.

(2) त्यामध्ये आधार नंबर टाकण्यासाठी विचारले जाईल, तिथे तुमचा आधार नंबर टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

(3) त्यानंतर आधारला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाकून आपल्या मोबाईल वर आलेला OTP आणि आधार OTP भरा, त्यानंतर लगेच तुम्हाला eKYC यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचं कळवलं जाईल…

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज आणि कृषी विषयक योजनांसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

महत्वाचे :  बर्‍याच शेतकर्‍यांना आता देखील ‘Service is unavailable’ चा एरर येत आहे, अशा परिस्थितीत काही वेळेनंतर पुन्हा प्रयत्न करून बघावे…

Leave a Comment