म्हाडाचे घर मिळवण्यासाठी काही ट्रिक असते का? लॉटरीत घर लागण्यासाठी काय करावे? पहा माहिती..!

Mhada Flats Mumbai : मुंबई स्वप्ननगरीत आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. शहरांमधील घरांच्या वाढत जाणाऱ्या किमतीकडे बघता अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते (1 bhk Flat in Mumbai). परंतु महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडामुळे अनेकांचे हे स्वप्न आता साकार होत असताना दिसत आहे. म्हाडाच्या माध्यमातून अगदी बजेटमध्ये आपल्याला घर (2 bhk Flat in Mumbai) उपलब्ध करून दिले जाते. म्हाडाच्या लॉटरी मध्ये घर मिळावे म्हणून एका व्यक्तीने तर स्वतःच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावाने एक नाही दोन नाही तर तब्बल 83 अर्ज सादर केले होते. तेही उच्च उत्पन्न गटामध्ये. त्यासाठी त्यांना तब्बल 62 लाख 25 हजार रुपये एवढी अनामत रक्कम भरावी लागली होती. यावरूनच आपल्याला समजेल म्हाडाच्या घरांचे महत्त्व किती आहे.

परंतु म्हाडामध्ये घर मिळवायचे असेल तर नक्की काय करावे लागेल? किती रुपये आपल्याला भरावे लागतील? गृह कर्ज कसे उपलब्ध करायचे? लॉटरीमध्ये घर जिंकण्याची शक्यता नक्की किती आहे? तुम्ही जी काही भरलेली अनामत रक्कम आहे ती परत मिळेल का? म्हाडाच्या बांधकामाचा दर्जा कसा असतो? असे विविध प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेच असतील. तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखामध्ये आपण पाहूया.

म्हाडा लॉटरीसाठी पात्रता काय आहे?

(1) म्हाडाच्या लॉटरी मध्ये अर्ज सादर करत असताना अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे. (2) अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असावी. (3) 25 हजार ते 50 हजार रुपये प्रति महिना उत्पन्न असलेले अर्जदार कमी उत्पन्न गटाच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकतील. (4) 50 हजार ते 75 हजार प्रति महिना उत्पन्न असलेले अर्जदार मध्यम उत्पन्न गटाच्या माध्यमातून अर्ज सादर करू शकतील. (5) ज्या अर्जदार व्यक्तींचे मासिक उत्पन्न कमीत कमी 75 हजार किंवा त्यापेक्षाही अधिक आहे ते उच्च उत्पन्न गटाच्या श्रेणीमध्ये अर्ज करू शकतील.

येथे वाचा – आता म्हाडाकडून दुकानांचा लिलाव; स्वस्तात दुकान घेण्याची संधी, पहा मुंबईत कुठे आहेत म्हाडाची दुकाने?

अनामत रक्कम आपल्याला परत मिळते का?

प्रत्येक उत्पन्न गटाप्रमाणे वेगवेगळी ठेव रक्कम आपल्याला भरावी लागते. उदाहरणार्थ अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची ठेव रक्कम अंदाजे दहा हजार रुपये आहे. तसेच तुम्हाला यामध्ये पाचशे रुपये प्रोसेसिंग फी सुद्धा भरावी लागेल (2 bhk Flat in Mumbai). लॉटरी मध्ये जर नंबर आला नाही तर दहा हजार रुपयांची ठेव रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होते. परंतु प्रोसेसिंग फी म्हणजेच पाचशे रुपये तुम्हाला परत मिळत नाहीत.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

आवश्यक कागदपत्रे (Mhada lottery Documents)

(1) अर्जदाराचे आधार कार्ड (Aadhar Card),
(2) पॅन कार्ड (Pan Card),
(3) बँक पासबुक (Bank Passbook),
(4) जन्म प्रमाणपत्र,
(5) मोबाईल नंबर,
(6) डॉमासाईल,
(7) पासपोर्ट आकार फोटो,
(8) ई-मेल आयडी (Email id)

म्हाडामध्ये घर लागण्याची शक्यता किती असते?

सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे एका व्यक्तीने म्हाडाचे घर मिळवण्यासाठी तब्बल 83 अर्ज सादर केले होते. यावरून नक्कीच तुम्हाला कल्पना आली असेल की म्हाडाची लॉटरी जिंकणे ही सुद्धा एक नशिबाचीच गोष्ट आहे. कारण की लोक अगदी चार-पाच वर्षांपासून म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करत आहेत. कित्येक नागरिक कुटुंबांमधील अनेक सदस्यांच्या नावाने अर्ज सादर करतात अशी सुद्धा उदाहरणे आपल्याला दिसतील. ज्या व्यक्तीने 83 अर्ज सादर केले होते त्या व्यक्तीला नशिबाने एक घर पतंग नगर घाटकोपर परिसरामध्ये मिळाले आहे.

तयारीला लागा; आता पुन्हा एकदा स्वस्तात म्हाडाचे घर घेण्याची संधी, येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हाडाचे घर मिळवण्यासाठी सोपी ट्रिक असते का? लॉटरीत घर लागण्यासाठी काय करावे?

म्हाडा लॉटरीत घर मिळवण्याची सोपी ट्रिक असते का? असं बर्‍याच जणांकडून विचारण्यात येते. त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की लॉटरीत घर मिळवण्यासाठी ट्रिक वगैरे काही राहत नाही. आपल्याला लॉटरी लागेल की नाही? हे निश्चितपणे सांगणे कठीणच आहे. परंतु थोडा अभ्यास जर केला तर नक्कीच आपण स्पर्धा कमी करू शकतो. म्हाडाकडे विविध उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध आहेत. यासोबतच काही विशिष्ट घटकांसाठी सुद्धा आरक्षित घरे असतात. जसे की गिरणी कामगार, पत्रकार इत्यादीसाठी तुम्ही विशिष्ट अशा गटांची संबंधित असाल तर अशावेळी या माध्यमातून तुम्हाला अर्ज सादर करता येईल आणि लॉटरीच्या माध्यमातून नाव येण्याचे चान्सेस वाढतील.

लॉटरी लागल्यानंतर काय?

म्हाडामध्ये लॉटरी लागली की आठवड्याभरातच संबंधित कार्यालयामध्ये जाणे गरजेचे आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच घराच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागेल. तिथून पुढे संबंधित कार्यालयाच्या माध्यमातून प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र तसेच आवश्यक कागदपत्रे थेट बँकेमध्ये जमा करावीत आणि या माध्यमातून तुम्ही गृह कर्ज मिळवू शकता.

लॉटरी लागल्यानंतर घराचा ताबा लगेच मिळतो का?

तुम्ही नक्की कोणत्या योजनेसाठी अर्ज सादर केला आहे? त्या प्रकल्पाची सध्याची स्थिती काय आहे? या सर्व गोष्टी यावर अवलंबून असतात. अनेक प्रकल्पांचे काम सुरूच असतात. तसेच काही प्रकल्प पूर्णपणे तयार झालेले असतात. त्यामुळे घराचा ताबा आपल्याला लगेच मिळणार आहे की नाही हे पूर्णपणे तुमच्या प्रकल्पावर अवलंबून असते.

म्हाडाच्या बांधकामाचा दर्जा कसा असतो?

ही योजना शासकीय असल्यामुळे बांधकामाचा दर्जा उत्कृष्ट असतो. परंतु अनेक प्रकल्प खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी घेतलेले असतात. त्यामुळे साईटला भेट द्यावी, अंडर कन्स्ट्रक्शन साइटवर जाऊनच तुम्ही याबाबत अधिक माहिती मिळवावी. याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे.

Leave a Comment