शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : ‘या’ कारणामुळे खतांचे दर वाढण्याची शक्यता, शेतकर्‍यांनी नक्की वाचा..!

शेतकरी वर्गाला नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो, कधी नैसर्गिक संकटाचा, कधी शेतमालाला मिळत असलेल्या कमी भावाचा तर कधी शेतीसाठी गरजेच्या असलेल्या औषधी व खतांच्या दर वाढीचा.

शेतकरी राजा आधीच पावसाळी संकटाने भरडला जात असताना आता महागाईने भरडला जाण्याची शक्यता आहे. शेतीसाठी आवश्यक असणार्‍या रासायनिक खतांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. या किमती वाढण्या मागे नेमकं काय कारण आहे? हे आपण या लेखामध्ये बघणार आहोत.. (Important news for farmers: Fertilizer prices may increase due to ‘this’ reason, farmers must read ..!)

‘या’ कारणामुळे खतांचे दर वाढण्याची शक्यता

मित्रांनो, कोणत्याही वस्तूचे दर वाढण्यामागे काहीतरी कारण असते असेच एक कारण खतांच्या दर वाढीसाठी जबाबदार ठरणार आहे. सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. यामुळे या दोन देशातील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील देवान घेवाणाचे व्यवहार ठप्प झाले आहे. या दोन देशात उत्पादन होणारा माल दुसर्‍या देशांमध्ये निर्यात करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहे त्यामूळे याचा परिणाम इतर देशांमधील अर्थकारणावर झाला आहे.

हे पण वाचा

खतांच्या दरांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खतनिर्मिती साठी आवश्यक असलेले पोटॅश युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते आणि भारतात युक्रेन मधून मोठ्या प्रमाणात पोटॅश आयात केले जाते. युद्धामूळे आयातीवर परिणाम झाला असल्याने देशातील खत उद्योगावर याचा ताण पडला आहे. ‘या’ कारणामुळे देशातील खतांच्या किमती मध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्पन्न कमी खर्च फार

दैनंदिन जीवनातील वापराच्या वस्तू असो की शेतीसाठी लागणारी साहित्य, यांचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढतच आहे. सततच्या वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांची “उत्पन्न कमी खर्च फार” अशी अवस्था झाली आहे.

Leave a Comment