शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी : येत्या दोन दिवसात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचे संकट..!

राज्यात वाढत्या तापमानामूळे गरमी वाढत असतानाच हवामान खात्याकडून एक महत्वाचा अंदाज समोर येत आहे. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आता हवामान खात्याने वर्तवली आहे. नॉर्थ केरळ ते मराठवाडा या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामूळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजा नुसार पाऊस मराठवाडा आणि विदर्भात येत्या एक ते दोन दिवसात म्हणजेच 19 आणि 20 फेब्रुवारीला हजेरी लावणार आहे.(Important news for farmers, rain crisis in these districts in the next two days)…

हे पण वाचा

आजचे सोयाबीन बाजार भाव
आजचे कापूस बाजार भाव

मराठवाडा आणि विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस

यामध्ये मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे – (1) लातूर (2) बीड (3) नांदेड आणि (4) परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे, तर यामध्ये विदर्भातील 9 जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. यामध्ये (1) अकोला (2) बुलढाणा (3) वाशिम (4) भंडारा (5) नागपूर (6) चंद्रपूर (7) अमरावती (8) गडचिरोली आणि (9) वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात देखील हलका ते तुरळक स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान अंदाज, शेतमालाचे बाजार भाव आणि शेती विषयक महत्वाची माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Read Marathi WhatsApp Contact

‘हा’ हवामान अंदाज ठरणार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकर्‍यांसाठी हा हवामान अंदाज खूप महत्वाचा ठरणार आहे, कारण या भागातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची कापणी केलेली आहे. यामध्ये हरभरा व गहू या पिकांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची कापणी झालेली आहे. बर्‍याच शेतकर्‍यांची पिके शेतातच पडून असल्यामूळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शेतकर्‍यांनी नुकसान टाळण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करणे गरजेच्या आहे. 

Leave a Comment