आता म्हाडाचे स्वस्त घर खरेदीसाठी नवी उत्पन्न मर्यादा; आता घर घेणे सोपे होणार?

Mhada Konkan Lottery 2023 : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ऑक्टोबरमध्ये होणार्‍या सुमारे 5 हजार घरांच्या ‘पीएमएवाय’ योजनेमधील 1 हजार घरांचा समावेश आहे. आजपर्यंत या घरांसाठी वार्षिक 3 लाख रुपये एवढी उत्पन्न मर्यादा लागू करण्यात आलेली होती. पण आता पुढील ऑक्टोबर महिन्याच्या सोडतीमध्ये वार्षिक 6 लाख रुपये एवढी उत्पन्न मर्यादा असलेल्या इच्छुक अर्जदारांना अर्ज करता येणार आहे.

केंद्र सरकारच्या (Central Government) आदेशानुसार मुंबई महानगर प्रदेशाकरिता ‘पीएमएवाय’ योजनेमधील घरांच्या लाभार्थ्यांकरिता आता वार्षिक 6 लाख रुपये एवढी उत्पन्न मर्यादा निश्चित केली आहे. आता कोकण मंडळाकडून या निर्णयाची अंमलबजावणी करून ऑक्टोबरमध्ये होणार्‍या सोडतीत (Mhada Konkan Lottery 2023) ही नवी उत्पन्न मर्यादा लागू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने सर्वांना घरे देण्याची घोषणा करीत ‘पीएमएवाय’ गृहनिर्माण योजना (Housing Scheme) आखली आहे. राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये लाखो घरांची निर्मिती करण्यात येत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने (Mhada Mumbai) या योजनेच्या माध्यमातून गोरेगावच्या पहाडी (Goregaon Pahadi, Mumbai) परिसरामध्ये 1 हजार 947 घरे बांधण्यात आली असून अलीकडेच या घरांसाठी सोडत (Mhada Lottery Mumbai) काढण्यात आली होती. दरम्यान कोकण मंडळाकडून या योजनेच्या माध्यमातून बोळींज, गोठेघर, शिरढोण, भांडार्ली, खोणी याठिकाणी 15 हजार घरांची निर्मिती केली जात आहे. यातील काही घरांकरिता सोडत काढण्यात आलेली आहे. आता अंदाजे 1 हजार घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात सोडत काढली जाणार आहे.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

महत्वाचे म्हणजे ‘पीएमएवाय’मधील घरांसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांचे देशात कोणत्याही भागात पक्के, हक्काचे घर नसावे तसेच त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आतमध्ये असावे अशा प्रकारच्या मुख्य अटी घातल्या गेल्या आहेत. पण मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशामध्ये बर्‍याच जणांना 3 लाखांच्या उत्पन्न मर्यादेच्या नियमाची पूर्तता करता येत नाही. जे याची पूर्तता करू शकतात अशांना घराची किंमत आणि उत्पन्न मर्यादा यामधील तफावतीमुळे गृहकर्ज मिळवणे शक्य होत नाही. त्यामुळे बर्‍याच इच्छुकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

हे लक्षात घेऊन म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव पहाडी याठिकाणी असलेल्या ‘पीएमएमवाय’ घरांसाठी एमएमआर क्षेत्रामधील लाभार्थ्यांना वार्षिक 6 लाख रुपये उत्पन्न मर्यादा लागू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. पण ही मागणी वेळेवर मान्य न झाल्यामूळे मे महिन्यातील सोडतीमधील गोरेगावमधील (Goregaon, Mumbai) 1947 एवढी घरे 3 लाख उत्पन्न मर्यादेनुसार विकली जात आहेत.

अरे वा! म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीत पहिल्यांदाच टेरेस फ्लॅट; किंमत फक्त एवढी, येथे क्लिक करून पहा..

उत्पन्न मर्यादा आणि किमतीत असलेल्या तफावतीमुळे या घरांसाठी विजेते ठरलेल्या अनेक विजेत्यांना गृहकर्ज (Home Loan) मिळणे कठीण झाले आहे. परिणामी या विजेत्यांना काही पर्याय नसल्याने घरे परत करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आता कोकणामधील ‘पीएमएवाय’ योजनेमधील घरांना खूपच कमी प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण आता उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याने या घरांना चांगलाच प्रतिसाद मिळेल आणि ही घरे विकली जाणार, अशी माहिती कोकण मंडळामधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

केंद्र सरकारच्या (Central Government) या निर्णयानुसार ऑक्टोबर महिन्यातील सोडतीमधील ‘पीएमएवाय’ योजनेच्या घरांकरिता वार्षिक 6 लाख उत्पन्न मर्यादा (Income limit) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता इच्छुक असलेल्या नागरिकांना या घरांसाठी (Mhada Flat) अर्ज करता येणार आहे. केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात उत्पन्न मर्यादेबाबतचा नवा निर्णय लागू केला आहे. या काळामध्ये मुंबई मंडळाच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यामध्ये आली होती. या कारणामुळे पहाडीमधील घरांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला नाही.

काय सांगता! सामान्यांसाठी दोन लाख घरे; आता स्वस्त घराचं स्वप्न पूर्ण होणार, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment