नोट निर्मीती ! कागदा पासून नव्हे तर अशा तयार होतात नोटा…

नोट निर्मीती | चलन निर्मीती. (Indian currency creation in Marathi)

नोट कशी बनते? आणि कुठे बनते? असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात फिरत असतात. आपल्याला कुठे बाहेर गावी जायचे असेल तर नोट खिशात असावी लागते. पावलोपावली पैशांची गरज भासते. पिण्याच्या पाण्यापासून ते सर्वच गोष्टींसाठी नोट गरजेची असते. त्यामूळे नोटांना प्रतेकाच्या आयुष्यात खुप महत्वाचे स्थान आहे. सकाळ झाल्यापासून ते रात्रीपर्यंत माणूस पैशांसाठी धडपड करत असतो. (Indian currency creation in Marathi).

पूर्वी देवाणघेवाण करत असताना खुप अडचणी येत असे. एका वस्तूसाठी दुसरी वस्तू द्यावी लागत असे. पण चलन प्रक्रियेमूळे देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया खुप सोपी झालेली आहे. नोटा देऊन तुम्ही हवं ते विकत घेऊ शकता. त्यामूळे नोटा कशा बनतात? असा प्रश्न एकदा तरी प्रतेकाला पडलेला असतोच.

हे पण वाचा

नोटांच्या देवाणघेवाण करण्याला पसंती

जग बदलत्या काळामूळे डिजिटल झाले आहे. खुप मोठ्या प्रमाणात लोक आता डिजिटल व्यवहार करण्यावर भर देत आहे. पण डिजिटल व्यवहार करत असताना खुप लोकांना अडचणी येतात. काहींना डिजिटल व्यवहार करणे खुप अवघड वाटते. तर काहींची माहितीच्या अभावामूळे फसवणूक झालेली असते. म्हणून असे लोक नोटांच्या देवाणघेवाण करण्याला खुप महत्व देतात. बऱ्याच वेळेस बँका आणि तात्काळ पैसे पाठवण्याच्या सुविधा देणाऱ्या कंपन्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळेस चलनी नोटांनी व्यवहार करणे सोईचे असते.

नोट निर्मीती | चलन निर्मीती (Indian currency creation in Marathi)

नोट निर्मीती, Indian currency creation in Marathi

नोटा कागदा (paper) पासून बनवतात असा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो. कागदापासून नोट निर्मीती जर केली तर त्या फाटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून नोट बनवत असताना 100 टक्के कापसाचा (Cotton) वापर केला जातो. त्यासोबतच गॅटलीन व आधेसिवेस या द्रवाचा वापर केला जातो. कापसामध्ये लेनिन (Linen) मोठ्या प्रमाणात असते. त्यामूळे नोटा लवकर फाटत नाही. आणि दीर्घ काळ चांगल्या राहतात.

भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार फक्त रिझर्व बैंक ऑफ़ इंडियाला आहे. RBI हे स्पष्ट केले आहे की ‘नोटा बनवत असताना त्यामध्ये 100 टक्के कापसाचा वापर केला जातो, त्यामूळे त्या अधिक काळ टिकतात’.

खराब व फाटक्या नोटा. (Torn notes in Marathi)

स्वच्छ नोट धोरणानुसार चलनातील खराब व फाटक्या नोटा नष्ट केल्या जातात. आणि नवीन नोटा चलनात आणल्या जातात. चलनातून वापस RBI कडे आलेल्या नोटांची छाननी केली जाते. त्यानंतर चांगल्या नोटा पुन्हा चलनात येतात. आणि फाटक्या नष्ट केल्या जातात.

बनावट नोटा रोखण्यासाठी खबरदारी. (Precautions to prevent counterfeit notes in Marathi)

बनावट नोटा मार्केट मध्ये येऊ नये म्हणून RBI कडून खुप खबरदारी घेतली जाते. नोटा सुरक्षीत रहाव्या म्हणून त्यामध्ये अनेक फीचर्सचा वापर केला जातो. वेळोवेळी नोटांचं डिजाइनही (Design) बदललं जातं. त्यामूळे नोटांची सुरक्षीतता वाढते.

Leave a Comment