कोरोना लस पुरवठ्या बाबत महाराष्ट्रावर अन्याय?

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये आज जवळपास साडेचार लाख ऐक्टिव रुग्ण आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण असतांना इतर राज्यांच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्राला सर्वात कमी लस पुरवठा केला जात असल्याचा आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला.

राजेश टोपे आज समाजमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की आपल्या राज्याला फक्त साडे सात लाख लस मिळाल्या आहे त्या तुलनेत उत्तरप्रदेशला आठ्ठेचाळीस लाख, मध्यप्रदेशला चाळीस लाख तसेच गूजरातला तीस लाख लस मिळाल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. रुग्ण संख्येच्या हिसोबाने महाराष्ट्राला सर्वात कमी लस मिळाल्या आहे. इतर राज्यांत कोरोना रुग्ण संख्या कमी असुन सुद्धा त्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस मिळाल्या. केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

गूजरातची लोकसंख्या सहा कोटी आहे. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी म्हणजे दुप्पट, दोन गूजरात म्हणजे एक महाराष्ट्र. गुजरात मधील ऐक्टिव रुग्णसंख्या सतरा हजार आणि महाराष्ट्रातील ऐक्टिव रुग्णसंख्या साडेचार लाख. गूजरातला दिलेले डोस एक कोटी आणि महाराष्ट्राला दिलेले डोस एक कोटी चार लाख. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रामाण गुजरातपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याकडे केंद्राने जास्त लक्ष दिलं पाहिजे असं राजेश टोपे पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केंद्र सरकार वर केला.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment