30 लाखात घेतलेले घर 50 मध्ये विकण्याची इच्छा? तर मग याठिकाणी मिळणार मोठी संधी, पहा बातमी..!

Real Estate : आजकाल लोक प्लॉट किंवा घरांमध्ये म्हणजेच रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवतात. कारण गुंतवणुकीतून काही वर्षातच दुप्पट पैसा मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गुंतवणुकीतून लोक बक्कळ पैसा कमवतात. पण प्रतेक माणसाच्या मनात एक प्रश्न असतो की प्लॉट किंवा घर कोणत्या ठिकाणी घ्यावे ज्यामुळे भविष्यात तेथील किंमती झपाट्याने वाढतील आणि भरमसाठ पैसा मिळेल. पण जर का चुकीच्या ठिकाणी प्लॉट किंवा घर विकत घेतले तर भविष्यात घेतलेल्या किमतीपेक्षा कमी किमत देखील मिळू शकते. म्हणून याठिकाणी आपण अशी काही ठिकाणे पाहणार आहोत जेथे प्लॉट किंवा घर खरेदी करून भविष्यात भरमसाट पैसा मिळेल.

रिअल इस्टेट संस्था CREDAI आणि सल्लागार फर्म कुशमन आणि वेकफिल्ड यांनी इजिप्तमधील शर्म-अल-शेख याठिकाणी आयोजित 21 व्या नॅटकॉन परिषदमध्ये हा अहवाल जारी करण्यात आला. यात भारतातील 10 बाजारपेठांची माहिती देण्यात आली आहे ज्यात प्रॉपर्टीचे भाव येणार्‍या काळात वाढण्याची शक्यता आहे.

दिवाळी, दसऱ्याला नव्या घरात; नवी मुंबईत सिडकोच्या घरांना मोठा प्रतीसाद, येथे क्लिक करून पहा बातमी..

सध्या हे आहेत प्रमुख रिअल इस्टेट बाजारपेठ (Real Estate Market)

अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिल्ली-एनसीआर, मुंबई (Mumbai), बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद ही देशातील प्रमुख रिअल इस्टेट बाजारपेठ (Real Estate Market) आहेत. कोरोनाचे संकट संपल्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात मागणी वाढली आहे. अलीकडच्या काळात देशातील काही भागात प्रॉपर्टी म्हणजेच घर किंवा प्लॉट घेण्याची संधी आहे. कारण भविष्यात प्रॉपर्टीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया सध्या घर किंवा प्लॉट खरेदीची संधी कुठे आहे.

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

सध्या या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी

सध्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये होत असलेली वाढ पाहता जयपूर, लखनौ, कोची आणि भुवनेश्वर देशातील 10 उदयोन्मुख असलेल्या बाजारपेठांमध्ये सामील झाले आहेत, असे एका अहवालात स्पष्ट झाले आहे. या यादीमध्ये लखनौ, कोची, जयपूर आणि भुवनेश्वरशिवाय कोईम्बतूर, इंदूर, नागपूर, सुरत, तिरुवनंतपुरम आणि विशाखापट्टणम यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment