जम्मू- काश्मीर ला दाखवलं वेगळा देश तर लेह दाखवला चीनचा भाग, पहा कोणत्या सोशल नेटवर्क कंपनीने केली चूक..!

दिल्ली : अलीकडे काही सोशल मीडिया कंपन्या कायद्याचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने घालून दिलेल्या अटींची पुर्तता ट्विटर ने वेळेत न केल्यामूळे सरकारने Twitter चे कायदेशीर सरंक्षण काढून घेतले होते. असं असताना Twitter ने परत एक चूक केली आहे. Twitter ने त्याच्या मॅप मध्ये जम्मू काश्मीर ला स्वातंत्र देश दाखवले आहे तर लेह ला चिंन चा भाग दाखवले आहे (Jammu and Kashmir was shown as a separate country, while Leh was shown as part of China). पण काही वेळेतच आपली चूक दुरुस्त करत ट्विटर ने आप्ल्या वेबसाइट वरून मॅप (map) हटवले आहे.

सोमवारी Twitter च्या वेबसाइट वर असा मॅप (map) आढळून आला ज्यामध्ये जम्मू काश्मीर ला स्वातंत्र देश तर लेह ला चिंन चा भाग दर्शवला होता. पण सोमवारी रात्री Twitter ने आपली चूक दुरुस्त करून हे मॅप हटवले. विशेष म्हणजे ट्वीटर ने अशी चूक अनेकदा केलेली आहे ज्या मध्ये भारताचा नकाशा चूकिचा दाखवला होता. भारत सरकारने पण कंपनीला चांगलाच जाब विचारला होता. पहिली चूकी दुरुस्त करण्यासाठी Twitter ने 15 दिवस घेतले होते. पण यावेळेस आपली चूकी एकाच दिवसात दुरुस्त केली आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.