खरेदी करा नवीन घर; पत्नीसोबत जॉइन्ट होम लोन घेतल्यास मिळतील मोठे फायदे, पहा कामाची बातमी..!

Joint Home Loan : शहरांमधील एखाद्या आवडीच्या ठिकाणी छोटेसे का असेना पण आपले स्वतःचे हक्काचे घर असावे. असे प्रत्येक नागरिक स्वप्न पाहतो. कित्येक नागरिक हे स्वप्न साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. लहानपण, शिक्षण, तसेच महाविद्यालयातील आयुष्य, पुढे जाऊन करिअरच्या वाटा, नोकरी तसेच त्यातून पुढे पाहिले जाणारे स्वप्न म्हणजे हक्काचे घर. कित्येक नागरिकांच्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी याच क्रमाने घडत असतात (Joint Home Loan tax benefit). आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी ज्यावेळी नोकरीला लागतो त्यावेळेस आपले पहिले ध्येय निर्माण होते ते म्हणजे सुरेख असे स्वतःचे हक्काचे घर.

Joint Home Loan

मेहनत करून, आर्थिक जुळवाजुळव करून, अनेक तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन शेवटी घर घेण्याच्या निर्णयापर्यंत कित्येक जण पोहचतात (Financial Managment). हा निर्णय दिसतो तितका सोपा नाही परंतु तितकाच आवश्यक आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक नियोजन कशा प्रकारे करायचे. मग यासाठी तुम्ही बँकेकडून सुद्धा मदत घेऊ शकता..

बाप रे! ठाण्यातील म्हाडाची घरे झाली महाग; येथे क्लिक करून पहा किती लाखांनी वाढवली किंमत..!

Home Loan आणि बरंच काही…

जास्तीत जास्त नागरिक घर घेतल्यानंतर घराची रक्कम गृह कर्जाच्या (Home Loan) माध्यमातूनच पूर्णपणे फेडतात. सर्वसाधारणपणे 20 ते 30 वर्षांपर्यंत आपण घेतलेले कर्ज आपली पाठच सोडत नाही. परंतु कित्येक जण घरा खातर अनेक हौसेमौजेंना आळा घालतात आणि स्वप्न पूर्ण करून दाखवतात. या सर्व बाबींमध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावतो तो म्हणजे बँकेच्या माध्यमातून आकारण्यात आलेला व्याजदर (Joint Home Loan with wife). अशावेळी एक अत्यंत महत्त्वाचा पर्याय तुमची मोठी मदत करू शकतो. तो पर्याय म्हणजे Joint Home Loan.

अर्ध्या किंमतीत मिळणार म्हाडाचं सर्वात मोठं घर; डोंबिवलीत घर उपलब्ध, पहा बातमी..

Joint Home Loan चे फायदे माहितीयेत? (Joint Home Loan tax benefit)

जर तुम्ही विवाहित असाल तर अशावेळी पत्नीला घराच्या कर्जासाठी थेट Co Applicant किंवा Co owner या ठिकाणी बनवू शकणार आहे. या माध्यमातून जर तुमची पत्नी नोकरी करत असेल तर अशावेळी या फायद्यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींची भर पडू शकते.. को ओनरशिपचा फायदा घेतल्यानंतर पत्नी सुद्धा कर्जाचे हप्ते फेडू शकते. पत्नीकडे अशावेळी घराचे 50 टक्के इतकी मालकी मिळते आणि अशातच तिने हे कर्ज फेडणे अपेक्षित असते. कर्ज सुरू असतानाच पत्नीने नोकरी सोडली असेल तर त्याची माहिती पूर्णपणे बँकेला द्यावी.

मुंबईत घ्या बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

तुमची पत्नी या गृह कर्जाच्या व्यवहारामध्ये Co Applicant किंवा Co owner या ठिकाणी असणार आहे. याचा तुम्हाला दुहेरी फायदा घेऊ शकता. होम लोन च्या प्री पेमेंट मुळेच व्याजदरामध्ये कलम 24 च्या माध्यमातून दोन लाखापर्यंतची करमाफी या ठिकाणी, तसेच प्रिन्सिपल अमाऊंट रिपेमेंट वर सेक्शन 80 सी च्या माध्यमातून दीड लाख रुपयांपर्यंत या ठिकाणी टॅक्स बेनिफिट मिळत आहे. ज्यामुळेच आता एकूण 3.5 लाख रुपयांचा अशावेळी फायदा होऊ शकतो. जर पत्नी को-ऑनर असेल तर हा फायदा अगदी बिनधास्तपणे दोघांनाही मिळून नेट टॅक्स बेनिफिट एकूण तब्बल सात लाख रुपये इतके असेल.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

लोन चा जो काही प्रस्ताव असेल त्यामध्ये को अप्लिकेट असा उल्लेख असेल तर लगेचच आपल्याला कर्ज मिळते. आणि या ठिकाणी रेस्करी वार्ड सुद्धा कमी होतो. ज्यावेळी एकल अर्ज असतो त्या बाबतीत इथे पडताळणी तसेच त्या पुढील प्रक्रियेसाठी थोडासा जास्तीचा वेळ दडवला जातो. बऱ्याच आर्थिक संस्था आहेत त्या खास महिलांसाठी अगदी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देतात. याशिवाय स्थिर तसेच उच्च मिळकत असणाऱ्या अर्जदारांना सुद्धा या ठिकाणी अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देतात. महिला अर्जदार असेल तर अशावेळी त्यांना या ठिकाणी दुप्पट फायदा मिळतो.

तुमची पत्नी जर नोकरी करत असेल तर नवीन घराच्या खरेदीच्या व्यवहारांमध्ये तिला सहभागी करू शकता आणि को अँप्लिकेट करू शकता. ज्या माध्यमातून कर्ज मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही अगदी बिनधास्तपणे पात्र ठरला. तसेच तुमचा सिबिल स्कोर या ठिकाणी चांगला असेल तर तुम्हाला अजिबात या कर्जाचे ओझे वाटणार नाही.

आनंदाची बातमी : आता या लोकांना मिळणार म्हाडाच्या घराची संधी; घराचे स्वप्न पूर्ण होणार..!

Leave a Comment