रेमडिसिवीर औषध न वापरता, कोरोना बाधित रुग्णांना मोफत उपचार देणारे जुलिया हॉस्पिटल…!

मुंबई : सध्या राज्यात रेमडिसिवीर औषधांचा तुटवडा जाणवत आहे. मागील काही दिवसांपूर्वी या रेमडिसिवीर औषधावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले पहायला मिळाले. रुग्णांच्या नातेवाईकांची मात्र या औषधासाठी खुपच फजिती झाल्याचं न्यूज़ व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपन सर्वांनीच पाहिलं. पण नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेले जुलिया हॉस्पिटल मात्र याला अपवाद आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉ. रवी आरोळे आणि डॉ. शोभा आरोळे हे बहीण-भाऊ कोरोना रुग्णांना रेमडिसिवीर औषधा व्यतिरीक्त रिकवर करण्याचे काम करत आहे.

हे रुग्णालय नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात आहे. डॉ. रजनीकांत आरोळे यांनी या रुग्णालयाची स्थापना केलेली आहे. जुलिया हॉस्पिटल या रुग्णालयाचा सर्व कारभार ग्रामीण विकास प्रकल्पाअंतर्गत होत आहे. या रुग्णालयात रुग्णांना आता पर्यंत मोफत उपचार देण्यात आलेला आहे. रुग्णालयात सध्या 650 रुग्ण उपचार घेत आहे. या रुग्णालयात कोरोनाच्या सुरवातीपासून रूग्णांना उपचार देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत या रुग्णालयातून सहा हजारापेक्षा अधिक रुग्णांनी उपचार घेतलेले आहे. आणि ते ही मोफत.

आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने सुचवलेल्या नियमावली नूसार आम्ही रुग्णांना उपचार देत असतो. आज पर्यंत आम्ही रुग्णांच्या उपचारासाठी रेमडिसिवीर औषध दिलेलं नाही.रेमडिसिवीर औषध खुप महाग असून ते न वापरता रुग्ण या आजारातून बरे झाले आहे. आम्ही रेमडिसिवीर औषधाचा विरोध नाही करत. ज्यांना ते वापरायचे आहे त्यांनी वापरावे. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या औषधांचा आम्ही व्यवस्थित वापर करत असल्याची डॉ. शोभा आरोळे यांनी माहिती दिली.

Leave a Comment