आता फक्त दोन कागदपत्रे दाखवा आणि म्हाडाचे घर घ्या; दोन आठवड्यांत मिळेल घराची चावी..!

मुंबईत घरांच्या किंमती खूपच महाग असल्याने लोक मुंबईच्या जवळपास असलेल्या उपनगरांमध्ये घर घेणे पसंत करू लागले आहे. तुम्हालाही मुंबईच्या जवळील भागात परवडणाऱ्या दरात हक्काचे घर घ्यायचे असेल तर म्हाडाने तुमच्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. आता अर्जदाराला म्हाडाचे घर घेण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यावे लागणार आहे. आता फक्त हे दोन कार्ड दाखवून म्हाडाचे घर खरेदी करता येणार आहे. म्हाडाने पहिल्यांदाच विरार-बोळिंजमध्ये तयार असलेल्या घरांची विक्री करण्यासाठी नियमांमध्ये मोठे बदल केले आहे.

घर घेणे झालं सोपं

म्हाडाच्या लॉटरीतून घर खरेदी करण्यासाठी वेगवेगळे कागदपत्रे (Documents) जमा करण्यासाठी धावपळ करावी लागते. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट, शपथपत्र आणि आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता जात प्रमाणपत्र एवढी सर्व कागदपत्रे जमा करावी लागतात. पण आता विरारमधील म्हाडाच्या घरांसाठी फक्त दोनचं कागदपत्रे जमा करावी लागणार आहे.

येथे वाचा – संधी सोडू नका; मुंबईत घरांची मोठी लॉटरी, ही कागदपत्रे तयार ठेवा..!

घरांची विक्री करण्यासाठी म्हाडाकडून नियमांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आलेली आहे. विरार भागात म्हाडाचे जवळपास 5 हजार एवढी घरे आहेत. या घरांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अनेक वेळा लॉटरी काढण्यात आली. पण या घरांची विक्री होऊ शकलेली नाही. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही योजना आणून देखील काहीच परिणाम झाला नाही. येथे पाण्याची समस्या असल्याने घर विक्री होत नसल्याचं समोर आलं आहे. पण आता ही घरे विकण्यासाठी म्हाडाने नियमांत बदल करून घर घेण्याची प्रक्रिया सोपी केली आहे.

दोन आठवड्यांत मिळेल घराची चावी

विरार बोळिंजमध्ये असलेल्या या गृह प्रकल्पामध्ये वन आणि टुबीएचके फ्लॅट (2 BHK Flats) आहेत. याठिकाणी असलेल्या वन बीएचके फ्लॅटची किंमत जवळपास 23 लाख रुपये तर टु बीएचके फ्लॅटची किंमत जवळपास 44 लाख रुपये अशी आहे. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पॅन कार्ड आणि आधार कार्ड या दोन कागदपत्रांद्वारे अर्ज सादर करू शकता. अर्जदाराने पैसे जमा केल्यानंतर दोन आठवड्यामध्ये अर्जदाराला घराची चावी देण्यात येणार आहे. विरार येथील घर खरेदी करण्यासाठी अर्जदार म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करु शकता. 

Leave a Comment