कांद्याची घसरण सुरूच? पहा आजचे कांदा बाजार भाव..!

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी जोरदार झालेल्या पाऊस व गारपिटीने राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍याचे कंबरडे मोडले होते. त्यातून पण शेतकरी कसा बसा उभा राहीला होता. जवळ उरलेल्या कांदा पिकाला चांगला भाव मिळून हे नुकसान भरून काढता येईल असं त्याला वाटत होते. पण चांगला भाव मिळवणं हे देखील त्यांच्या नशिबात नसल्याचं दिसत आहे. गेल्या दोन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली. शेतीला लावलेला खर्च कसा काढावा? हा प्रश्न आता शेतकर्‍यांसमोर आहे.(Onions continue to decline? See today’s onion market prices)…

राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याची दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. काल अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला 1 हजार ते 1100 रुपये भाव मिळाला. याच कांद्याला 3 ते 4 आठवड्यांपूर्वी 3 हजार ते 3300 रुपये भाव मिळत होता. नेमका आज काय भाव मिळत आहे? सुधारणा झाली की घसरण सुरूच आहे? हे आपण या लेखात बघणार आहोत.

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव (Kanda Bajar Bhav 20-03-2022 Sunday)..

आजचे कांदा बाजार भाव दि.20 मार्च 2022 वार – रविवार

(1) पुणे  :
दि. 20 मार्च 2022 (वार – रविवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 17777 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1400
सर्वसाधारण दर – 900

(2) पुणे – मोशी  :
दि. 20 मार्च 2022 (वार – रविवार)
शेतमाल – कांदा
आवक  – 491 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 400
जास्तीत जास्त दर – 1200
सर्वसाधारण दर – 800

आजचे सर्व ताजे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आजचे कांदा बाजार भाव

Kanda Bajar Bhav 20-03-2022 Sunday

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद..

Leave a Comment