कंगना रानौतची महाराष्ट्रातील लॉकडाउन वर टीका; सोशल मीडिया वर फोटो केला शेयर..!

मुंबई : कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन काही राज्यांनी आपआपल्या राज्यांत परिस्थितीच्या हिसोबाने निर्बंध घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे महाराष्ट्रातही महाराष्ट्र सरकारने पंधरा दिवसांचा कडक लॉकडाउन लावला आहे. पण कंगणा रानौत ने आपल्या ट्वीटर वर फोटो शेअर करत महाराष्ट्रातील लॉकडाउन ची चेष्टा केली आहे. तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये भिंत नसलेले घर आहे, त्या घराचा दरवाजा बंद असुन त्याला टाळे लावलेले आहे. महाराष्ट्रातील सध्य परिस्थिती या फोटो च्या माध्यमातून तिने दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या कोरोना महामारीने देशात तांडव केला आहे. ही महामारी सुरू असतांना राजकिय पुढारी, मंत्री व विविध क्षेत्रातील कलाकार हे कोरोना परिस्थिवर लक्ष ठेऊन राजकारण व एक मेकांवर टिका करण्यात चांगलेच मश्गुल झाले आहे. कोरोनाचे सर्वात जास्त आकडे महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारचा शिथील लॉकडाउन असल्यामुळे कंगणा रानौत ने ट्वीटरवर फोटो शेअर करत थेट महाराष्ट्र सरकार वर निशाना साधला आहे.

नेट कऱ्यांचा मिळतोय प्रतिसाद


कंगणा ने ट्विटर वर फोटो शेअर केल्यानंतर तीच्या चाहत्यांनी महाराष्ट्र सरकार वर टिका करत कंगणा रानौत च्या फोटोला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. एका चाहत्याने एका मुलाचा फोटो तीच्या फोटो वर प्रतिसाद म्हणून अपलोड केला आहे. त्यामध्ये त्या मुलाच्या अंगाच्या एका भागावर कपडे आहे आणि दुसर्या भागावर कपडे नसल्याचा फोटो आहे. अशा प्रकारच्या पोस्ट आणि फोटोच्या माध्यमातून कंगना रानौत आणि तिच्या चाहत्यांनी महाराष्ट्र शासनाच्या लॉकडाउन वर टिका केली आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment