सर्व शेतकरी मित्रांना ReadMarathi.Com तर्फे नमस्कार, मित्रांनो या लेखातच्या माध्यमातून आज सर्वाधिक कापूस दर नेमका कोणत्या बाजार समिती किंवा जिल्ह्यात मिळतोय? हे आपण जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा…(Kapus Bajar Bhav 21-02-2022 Monday)
राज्यातील कापूस बाजार भाव सध्या 9 ते 10 हजाराच्या मध्ये स्थिर आहे. पण राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये 10,500 च्या समोर दर मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया सर्वाधिक दर मिळालेल्या बाजार समित्यांविषयी…
शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सिंदी (सेलू) या बाजार समितीमध्ये कापसाला आज (21 फेब्रुवारी) सर्वाधिक दर मिळत आहे. या बाजार समितीत कापसाची 2839 क्विंटल आवक आली आहे. इथे कापूस दर इतर बाजार समित्यांच्या तुलनेत नेहमीच तेजीत असतात. आज म्हणजेच 21 फेब्रुवारी 2022 रोजी या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 10,570 रुपये दर मिळाला आहे, कमीत कमी दर 9000 रुपये मिळाला आहे तर सर्वसाधारण दर 10,300 एवढा आहे.
त्यानंतर या खालोखाल दर मिळवणारी बाजार समिती वर्धा जिल्ह्यातीलच आहे. ती बाजार समिती म्हणजे पुलगाव. आज या ठिकाणी कापसाची 1950 क्विंटल आवक आली आहे. येथील जास्तीत जास्त मिळालेला दर 10,551 रुपये आहे, कमीत कमी दर 7900 तर सर्वसाधारण दर 9400 रुपये आहे.
आज परभणी जिल्ह्यातील मनवत बाजार समितीत देखील कापसाला चांगला दर मिळाला, या बाजार समितीत जास्तीत जास्त दर 10,330 रुपये मिळाला आहे. येथील कापसाची आजची आवक 2500 क्विंटल आहे. कमीत कमी दर 8300 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,170 रुपये मिळाला आहे. त्यासोबतच नागपूर जिल्ह्यातही कापसाला चांगला दर मिळाला आहे..
आजचे सर्व जिल्हानिहाय (District wise) ताजे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या… धन्यवाद.