आता कापूस उत्पादन वाढणार; कापसावरील बोंड अळीचा अशा प्रकारे केला जाणार नायनाट.!

शेअर करा

गेल्यावर्षी कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाला. कापसाला तर खूप वर्षानंतर उच्चांकी दर मिळाला. त्यामूळे या खरिपात कापसाचा पेरा मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त असण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीचे कापसाचे दर लक्षात घेऊन यावर्षी कापसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधव प्रयत्न करत आहे. राज्याच्या काही भागात पाऊस उशीरा पोहोचल्याने तेथील शेतकर्‍यांनी कापसाच्या लवकर येणार्‍या वाणाला प्राधान्य दिल्याचं दिसतय. पण हे सर्व करत असताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र बोंड अळीची भीती नेहमीच सतावत असते. बोंड अळीमूळे कापूस उत्पादनात खूप मोठी घट येत असते.

‘या’ तंत्रज्ञानाच्या मदतीने बोंड अळीवर मात

शेतकर्‍यांनी बोंड अळीला रोखण्यासाठी आतापर्यंत वेग वेगळे उपाय करून बघितले आहेत. पण त्यामध्ये यश मिळालेले नाही. त्यामूळे हा धोका कायम आहे. पण अलीकडे ‘मेटिंग डिस्टर्बन्स’ या तंत्रज्ञानाच्या मदतीने या बोंड अळीवर मात केली जाणार आहे. हा प्रयोग 23 जिल्ह्यांमध्ये होणार असून याबाबत एका खासगी कंपनी सोबत करार केला आहे. यावर्षी पासूनच याला सुरवात केली जाणार आहे.

येथे वाचा – कापूस लागवड करताय? मग हे तण नाशक फवारा

अशी केली जाणार प्रक्रिया

या प्रक्रियेत गंधक रासायनाचा वापर करून बोंड अळी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कापसाच्या झाडावर एका विशिष्ट भागात हे गंधक लावल्यानंतर मादी – नराचे मिलन होण्यास अडचणी निर्माण होणार आहे. मिलन न होणे आणि अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडचणी यामुळे नवीन अळ्यांची निर्मिती होणार नाही. ही पद्धत यशस्वी झाल्यास कापूस उत्पादक शेतकर्‍यांना बोंड अळीपासून सुटका नक्कीच मिळणार आहे. बोंड अळीला रोखण्यासाठी वापरण्यात येणारी ही पद्धत किचकट स्वरूपाची वाटत असली तरी ही पद्धत खूप उपयुक्त ठरेल असा विश्वास कापूस संशोधन संस्थेच्या संचालकांनी व्यक्त केला आहे..

शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..