कापसाच्या बंपर उत्पादनासाठी असे करा कपाशीचे खत व्यवस्थापन..!

शेअर करा

मागच्या हंगामात कापसाने शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आणले, पाच ते सहा हजार प्रति क्विंटल ने विकणारा कापूस चक्क दुप्पट झाला. मागच्या हंगामात कापूस 13 ते 14 हजार रुपयांपर्यंत गेला. पण अतिवृष्टीने शेतकऱ्याला कापसाचे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही.

महत्वाची माहिती अशी की या वर्षी कापूस लागवडी मध्ये अंदाजे 5-10% वाढ होण्याची शक्यता आहे. तरी पण कापसाचे भाव चांगल्या दरात स्थिर राहतील. कापूस उद्योगांकडून या वर्षीही कापसाची अधिक मागणी असणार आहे असा अंदाज आहे. मागील वर्षी शेतकर्‍यांना अतिवृष्टी मुळे कापसाचे उत्पादन कमी मिळाले, पण या वर्षी कापसाचे जास्तीत जास्त उत्पादन हाती कसे येईल असा प्रयत्न शेतकरी करत आहे.

जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांना आपल्या कपाशीच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठीच सदर लेखामध्ये कापसाचे योग्य खत व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल हे आपण जाणून घेणार आहोत.

येथे वाचा – कापूस लागवड करताय? मग हे तण नाशक फवारा आणि करा तणाचे व्यवस्थापन..!

कापसाला एकरी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 50 किलो पालाश शिफारस केली गेलेली आहे. मात्र त्यासोबतच कापूस हे एक तेलवर्गीय पीक असल्यामुळे कापसाला गंधक(sulphur) या दुय्यम अन्नद्रव्याची npk बरोबरच आवश्यकता असते. सतत कापूस आणि सोयाबीन पिके घेतल्या मुळे जमिनीतील गंधक कमी झालेले आहे त्या मुळे रासायनिक गंधक खत देणे आवश्यक आहे.

लागवडी नंतर खताची पहिली मात्रा

लागवडी नंतर 20 ते 30 दिवसा दरम्यान कापूस पिकाला खताची पहिली मात्र देणे आवश्यक आहे. यात आपन एकरी एक बॅग 10:26:26+ 10 किलो गंधक घेऊ शकता किंवा एकरी एक बॅग सिंगल सुपर फोस्पेट(दाणेदार)+25 किलो नत्र+ 25 किलो पोटॅश
किंवा एकरी एक बॅग 20:20:0:13+ 25 किलो पोटॅश

दुसऱ्या वेळेसची खताची मात्रा

लागवडी नंतर 40 ते 50 दिवसा दरम्यान
एकरी एक बॅग डी ए पी+25 किलो पोटॅश+ सुक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो

तिसरी खताची मात्रा

लागवडी नंतर 65 व्या दिवशी एकरी दाणेदार एक बॅग+ युरिया 1 बॅग+ मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो

चौथी खताची मात्रा

लागवडीच्या 90 दिवसा नंतर कापसाला नत्राची आवश्यकता असल्यामुळे एकरी एक बॅग युरियाची देणे..

वरील खत टाकल्यास नक्कीच कापूस उत्पादनामध्ये वाढ होईल. मित्रांनो, कमी शब्दात उपयोगाची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. शेती विषयक दर्जेदार माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…