कापूस लागवड करताय? मग हे तण नाशक फवारा आणि करा तणाचे व्यवस्थापन..!

कापूस तण व्यवस्थापन | Kapus Tan Nashak Favarni

या खरीप हंगामामध्ये कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर कापूस लागवड केली आहे. आणि  उरलेल्या 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांची लागवड बाकी आहे. कारण की कोरडवाहू कापूस घेणारे शेतकरी मान्सून ची वाट पाहत आहे. आता लवकरच मान्सून च्या सरी बरसणार अशी शक्यता आहे.

कापूस लागवडी नंतर शेताची मशागत सुरू होते आणि ती केली जाते तण व्यवस्थापनासाठी. पण अंतर मशागतीच्या साहाय्याने फक्त न पेरलेल्या जागेतीलच तण नष्ट होते. पेरलेल्या सरीतील तण तसेच राहते. मजुरांच्या निर्माण होत चाललेल्या टंचाईमुळे हे तण काढणे लवकर शक्य होत नाही.

त्यामुळे आपण या लेखा मध्ये कापूस पिकातील उगवण पूर्वीचे आणि उगवण नंतर तणांचे व्यवस्थापन कसे करायचे हे पाहणार आहोत.

येथे वाचा – यंदा सोयाबीन पेरत असाल तर अशा पद्धतीने करा सोयाबीन मधील तणाचा नायनाट..!

(1) Pyrithiobac Sodium 10% EC

हे एक प्रकारचे सेलेक्टिव्ह तणनाशक आहे. हे तणनाशक कापूस पिकामध्ये उगवण पूर्वी तसेच उगवणी नंतर ही वापरता येते. हे कापसातील रुंद तसेच गोल पानाच्या तणांचे नियंत्रण करते. उगवण पूर्वी वापरायचे असल्यास लागवडी नंतर तीन दिवसापर्यंत फवारायला चालते.
कापूस उगवल्यानंतर कापसाला सात आठ पाने आल्यानंतर पण हे तणनाशक फवारले तर तण नियंत्रण होते. वापरायचे प्रमाण: 300 ml प्रति एकर

(2) Quizalofop Ethyl 5% EC

हे तणनाशक रुंद पाने असलेल्या पिकातील गवत वर्गीय तण संपवण्यासाठी वापरले जाते. त्या मुळे हे कापसातही चालते. हे pre आणि post Emergence स्वरूपाचे तणनाशक आहे. उगवण पूर्वी, लागवडी पश्चात तीन दिवसांच्या आत फवारावे. उगवण नंतर कापूस 7 ते 8 पानाचा झाल्यावर फवारल्यास कापसतील गवत वर्गीय तणाला संपवते.
प्रमाण: प्रति एकर 300-400 ml

जर कापूस पिकात दोन्ही प्रकारचे जसे की गवत वर्गीय आणि गोल व रुंद पानाचे तण असेल तर वरील दोन्ही प्रकारचे तण नाशक फवारले तर चालते.

शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा 

Leave a Comment