एका चुकीमुळे केजरीवालांना हात जोडून मागावी लागली माफी..!

दिल्ली : काल पार पडलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीचं केजरीवालांनी थेट प्रक्षेपण केल्याचा प्रकार घडला. ही केजरीवालांची चुकी पंतप्रधान मोदींनी उघड केली आणि त्यांना कडक शब्दात सुनावलं. ही बैठक कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पार पडली. उपस्थीत असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपआपले प्रश्न व समस्या पंतप्रधान मोदींना सांगितल्या.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. दिल्लीतील रुग्णालयात आॅक्सिजनचा खुप मोठा तुटवडा आहे. आॅक्सिजन संदर्भात मला रोज फोन कॉल येतात. काही रुग्णालयात दोन तासांचा आॅक्सिजन शिल्लक असल्याचं कळवण्यात येतं तर काही रुग्णालयातून तीन तास आॅक्सिजन शिल्लक असल्याचं कळवण्यात येतं. एका इस्टिमेटनूसार दिल्लीला 700 टन आॅक्सिजनची गरज आहे. तुम्ही तो आॅक्सिजनचा कोठा 480 केला. त्याबद्दल खुप खुप आभार. पण मागील 24 तासात 480 टन आॅक्सिजन पैकी 350 टन आॅक्सिजन दिल्ली पर्यंत येऊ शकला आहे. आम्ही यामागचे कारण शोधण्याचा प्रयन्त केला तेव्हा माहिती पडलं की मागील राज्यांनी दिल्लीसाठी आणला जात असलेला आॅक्सिजन ट्रक अडवून ठेवलेला आहे. सर, हे टाळण्यासाठी आपन त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक फोन जरी केला तरी तेव्हढ पुरेसे आहे. असं बैठकीत अरविंद केजरीवाल बोलत होते.

दरम्यान, बैठक चालू असतांना अरविंद केजरीवाल या बैठकीचं थेट प्रक्षेपण करत होते. हे मोदींच्या लक्षात येताच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले ‘तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रोटोकॉल मोडला आहे, अशा खासगी संवादाचा प्रचार-प्रसार केला जात नाही. असं त्यांनी केजरीवालांना सुनावल्यानंतर त्यांनी आपली चुक झाली असल्याचं कबूल केलं. ‘येणाऱ्या काळात मी याची काळजी घेईन. माझ्याकडून चूक झाली असेल, मी काही कठोरपणे बोललो असेन, तर मी त्यासाठी माफी मागतो,’ असं म्हणत केजरीवालांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये हात जोडले.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment