शेतकर्‍यांनो! पीक विमा भरा; जाणून घ्या कुठे भरायचा? किती पैसे लागतील? कोणत्या पिकांसाठी भरता येणार? शेवटची तारीख?

शेअर करा

ReadMarathi.Com : नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2022 च्या खरीप हंगामाला आता सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण पणे झालेली आहे. आता फक्त पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. पेरणी झाल्यानंतर गरजेनुसार खत, औषध व्यवस्थापन करणे आणि भरगोस उत्पादन मिळवणे हाच विचार शेतकरी करत असतो. पण एखाद्या वर्षी हे शक्य होत नाही. शेतकरी राब राब राबून पीक लहानाचे मोठे करतो, पण नैसर्गिक आपत्ती, रोगराई, अनपेक्षित एखादे संकट शेतकऱ्याचे पीक माती मोल करून टाकते.

त्यासाठी शेतकऱ्याचे पीक सुरक्षित असावे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरायलाच पाहिजे. पीक विमा हा शेतकऱ्यांना नैसर्गिक अप्पतीपासून संरक्षण करत असतो. त्यामुळे या लेखात आपण प्रधान मंत्री पीक विमा योजना संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

पीक विमा कुठे भरायचा?

1 जुलै 2022 ला नवीन पीक विमा योजनेचा शासन निर्णय आला. तेव्हापासून, प्रधान मंत्री पीक विमा योजना खरीप 2022 अर्ज करणे सुरू झाले आहेत. या वर्षीची योजना ही कप अँड कॅप पॅटर्न (बीड पॅटर्न) नुसार राबविली जाणार आहे. आपले पीक आपत्ती पासून सुरक्षित करण्यासाठी शेतकरी आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊन खरीप पीक विमा भरू शकता. पीक विमा भरण्याची शेवटची तारिक 31 जुलै 2022 आहे.

येथे वाचा  – बाप रे! बनावटी खत आणि उत्पादनात घट; ‘या’ पद्धतीने ओळखा ओरिजिनल आणि बनावटी खत..!

या पिकांचा भरता येणार पीक विमा

पीक विमा 2022 साठी काही मुख्य पीक अधिसूचित करण्यात आलेले आहे. प्रधान मंत्री पीक विमा योजना 2022 साठी अधिसूचित केल्या गेलेल्या पिकांची नावे खलील प्रमाणे,

नगदी पिके

कापूस आणि खरिपातील कांदा

तृणधान्य व कडधान्य पिके

खरीप ज्वारी, बाजरी, मूग, उडीत, तूर, मका, धान, नाचणी

गळीत धान्य पिके

सोयाबीन, भुईमूग, कारळे, तीळ, सुर्यफुल

वरील सर्व पिकांचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना 2022 साला करिता भरता येणार आहे.

येथे वाचा  – सोयाबीनसाठी पहिली फवारणी ही घ्या, खोड माशी आणि चक्री भुंगा होईल गायब..!

प्रत्येक पिकासाठी लागणारा प्रीमियम असा जाणून घ्या

पीक विमा योजना 2022 साठी अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्याला आपल्या पिकानुसार व पेरलेल्या क्षेत्रानुसार किती प्रीमियम भरावा लागणार हे जाणून घेण्यासाठी गूगल प्ले स्टोरला उपलब्ध असलेले Crop Insurence नावाचे अँप सर्वात अगोदर डाउनलोड करायचे आहे.

त्या नंतर अँप उघडायचे आहे. अँप उघडल्या नंतर तुम्हाला चार पर्याय दिसतील
त्यातील चौथ्या क्रमांकाचा पर्याय जो आहे
Continue Without log in ला निवडायचे आहे.

त्यानंतर आपल्याला पाच पर्याय दिसतील तर या पैकी तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यायाला निवडायचे आहे जो आहे Know insurance premium, यामध्ये कोणत्या पिकासाठी पीक विमा भरायचा आहे ही माहिती भरल्यानंतर आपल्याला भरावयाच्या प्रीमियम बाबत माहिती दाखवली जाईल..

शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…