खेकडा पालन व्यवसाय, लाखो रुपये कमावण्याची संधी..!

खेकडा पालन व्यवसाय, लाखो रुपये कमावण्याची संधी (Khekda Palan Information)

कोरोना काळात लॉकडाऊनमूळे शहरी भागातील बरेच लोक बेरोजगार झाले, त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात येण्याचा निर्णय घेतला. त्यामूळे अल्पभूधारक शेती असलेल्या कुटुंबांवर याचा भार पडला. शेती करणे परवडत नसल्यामुळे अशा कुटुंबांना आपल्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा शेतकरी कुटुंबांना शेती पूरक व्यवसाय म्हणून खेकडा पालन व्यवसाय नफ्याचा ठरू शकतो. या लेखात खेकडा पालन व्यवसायाची माहिती आपण घेणार आहोत, त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा… (Crab Farming In Marathi)

इतर शेती पूरक व्यवसायांसोबतच जसे कि कुकुट पालन, शेळी पालन , मत्स्य पालन इत्यादी व्यवसायात सध्या जेवढी संधी आहे तेवढीच संधी खेकडा पालन व्यवसायात शेतकऱ्यांना आहे. खेकडा या प्राण्याचे व्यवसायिक आणि अरोग्याशी संबंधित गोष्टींचा जर विचार केला तर खेकडा पालन शेतकऱ्यांना लाखो रुपये कमाविण्याची चांगली संधी मिळवून देऊ शकतो.

खेकड्यांचे प्रकार (Type of Crab)

खेकड्याचे मुख्यतः २ प्रकार आहेत हिरवा खेकडा आणि  केसरी खेकडा . हिरवा खेकडा याला बाहेर देशातून चांगली मागणी आहे  आणि हा खेकडा वजनाने पण जास्त आहे हा साधरणता १ ते १.५ किलो वजनी असतो . केसरी खेकडा म्हणजे आपल्या नदी नाल्यांमध्ये आढळणारा खेकडा याला स्थानिक मागणी जास्त असते. हा वजनाला ५०० ते ७०० gm भरतो. या लेखामध्ये आपण खेकडा पालन व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

खेकडा पालन व्यवस्थापन

खेकडा पालन तसे व्यवसायिकरित्या आधी केले जात नव्हते. पण आता बाजारातील असलेल्या मागणीला लक्षात घेऊन या व्यवसायाला दिवसेंदिवस व्यापारिक स्वरूप प्राप्त होत आहे . हा व्यवसाय करण्यासाठी दोन घटक आवश्यक आहे  – (1) वर्षभर पुरेल असा पाणी साठा आणि (2) जमीनक्षेत्र, हा व्यवसाय आपण दोन ठिकाणी करू शकतो एक तर खडकाळ जमिनीवर असलेला पाणी साठा किंवा कृत्रिम रित्या पाणी साठा निर्माण करून. आपण या लेखामध्ये मुख्याता कृत्रिम रित्या कसे खेकडा पालन करावे या विषयी जाणून घेणार आहोत .

यासाठी खोल कमीत कमी ११ बाय ११ मापाचा सिमेंट चा हौद तयार करून त्यात माती , दगड , गोटे टाकून आणि खेकड्यांना लपता यावे यासाठी कृत्रिम जागा तयार करून या व्यवसायाची सुरुवात करता येऊ शकते. खेकडे उपलब्ध करण्यासाठी स्थानिक ठिकाणी असणारे नदी, नाले आणि धरनांमधून आणू शकता. तसेच बीज मिळविण्यासाठी क्रॅब रिसर्च सेंटर, चेन्नई (तामिळनाडू) येथे संपर्क करू शकता. तसेच महाराष्ट्रातील खार , पनवेल येथे पण बीज उपलब्ध होते.

खेकडा पालनाची सुरुवात कधी करावी?

साधारणतः पाउस  सुरु झाल्या पासून खेकडे पिले द्यायला सुरुवात करतात त्यामुळे या व्यवसायाची सुरुवात जुन -जुलै महिन्यापासून करता येऊ शकते. इतर वेळी जरी या व्यवसायाची सुरुवात केली तरी चालते पण खेकड्याच्या मादा जून -जुलै दरम्यानच पिल्लांना जन्म देतात.

खेकड्यांना लागणारे खाद्य

खेकडा तसा स्वताचे अन्न स्वतः शेधून खातो पण हौदात हे शक्य नाही म्हणून त्यांना नियमित खाद्य हे द्यावे लागते. खेकड्यांना माश्यांचा जो न उपयोगात येणारा वेस्ट (waste) असते ते चालते आणि हे अगधी मच्छी मार्केट मध्ये मोफत मिळते. तसेच खेकड्यांना भात पण खाद्य म्हणून वापरता येते. साधारणतः १० पिल्लांना १ kg खाद्य लागते.

खेकड्यांचे वार्षिक उत्पादन , उत्पन्न आणि दर

जर केसरी खेकड्यांचे पालन केले तर १०० पिल्लांमागे  एक पिल्लू ७ ते ८ महिन्यात ५०० ते ७०० gm वजनाचे होते त्यामुळे ५० ते ६० kg वजन मिळते आणि स्थानीक भावानुसार ( ३०० ते ५०० रुपये प्रती किलो )  प्रमाणे अंदाजे १८००० तव ३०००० रुपये उत्पन्न हाती येते.

खेकड्यांची विक्री

खेकडे आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे खेकड्यांना वर्षभर मागणी असते. खेकडे कॅल्शियम चा चांगला स्त्रोत असल्यामुळे याला स्थानिक ग्राहकांकडून जास्त मागणी असते. आणि असे पण निदर्शनात आलेले आहे कि ग्राहक स्वतःच विक्रेत्याकडून मालाची खरेदी करत असतो.

मलेशिया सारख्या देशात खेकड्यांची अत्याधुनिक पद्धतीने शेती केली जाते. या शेतीला जर तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर नक्की शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय मोलाचा दगड ठरू शकतो.

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक सर्व माहिती मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Comment