किसान विकास पत्रावर सरकारने वाढवले ​​व्याज, आता पैसे दुप्पट होणार, वाचा संपूर्ण माहिती..!

Kisan Vikas Patra : प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचे पैसे कमी वेळात दुप्पट व्हावेत. पण अनेक वेळा लोकांना आपले पैसे दुप्पट कसे होतील याची कल्पना नसते. म्हणूनच आज आम्ही अशा लोकांना पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे पैसे नक्कीच दुप्पट होतील आणि तुमचे पैसेही सुरक्षित राहतील. चला तर मग जाणून घेऊया या स्कीमबद्दल..

किसान विकास पत्रात आता एवढे व्याज मिळणार

आपण पोस्ट ऑफिसच्या एका जबरदस्त स्कीम बद्दल बोलत आहोत ज्याचं नाव आहे किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra).. आतापर्यंत किसान विकास पत्रावर सरकारकडून 7.2 टक्के व्याजदर मिळत होते. मात्र अलीकडे 0.70 टक्के व्याजदराने वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता गुंतवणूकदारांना किसान विकास पत्र स्कीम वर 7.5 टक्के दराने व्याज दिले जाईल.

येथे वाचा – अरे वा! म्हाडाची घरं पाहून तुम्ही व्हाल खुश, कमी किंमतीत मिळणार्‍या घरांचा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा..!

चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळेल

किसान विकास पत्र ही एक छोटी बचत योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदाराला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेत, गुंतवणूकदार 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकतो आणि त्यात कितीही जास्त रक्कम ठेवू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकास पत्र योजना खाते उघडण्यासाठी, कोणतीही व्यक्ती आधार कार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि किसान विकास पत्राचा अर्ज यांसारखी आवश्यक कागदपत्रे घेऊन आपले खाते उघडू शकते.

अल्पवयीन देखील खाते उघडू शकतात

तसे, कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपले खाते आरामात उघडू शकते. जर कोणी अल्पवयीन असेल (10 वर्षांखालील), तर तो हे खाते त्याच्या पालकांच्या संरक्षणाखाली उघडू शकतो. तो 10 वर्षांचा होताच ही योजना त्याच्या नावावर होईल. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 3 लोक या योजनेत एकत्रित खाते म्हणून सामील होऊ शकतात. यामध्ये गुंतवणूकदाराला आणखी एक विशेष सुविधा देण्यात आली आहे की, लाभार्थी त्याचे किसान विकास पत्र इतर कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करू शकतो.