कोरोनाची भीती सोडा आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी हे करा.!

मुंबई : कोरोना महामारीमुळे प्रतेकाच्या मनात दहशत नक्कीच आहे. पण मनातील भीतीमुळे कोरोना संपणार नाही उलट त्यामुळे आपले आरोग्य खालवण्याची भीती अधिक असते. त्यासाठी कोरोनाची भीती सोडा आणि उत्तम आरोग्य राखण्यावर भर द्या. त्यासाठी आपन पहाटे दिवसाची सुरवात करत असतांना काही नियम पाळणे गरजेचे आहे. काही गोष्टी नियमित आमलात आणायला पाहिजे.

व्यायाम आणि योगा – सकाळी लवकर उठून योगा आणि व्यायाम केल्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. श्वासोच्छ्वास संबंधी प्राणायम केल्यास आपले फुफ्फुसे निरोगी राहतात. व्यायाम आणि योगा नियमित केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. आज पासूनच हे आमलात आणा.

ओवा टाकून गरम पाण्याची वाफ घेणे – गरम पाण्याची वाफ छाती मध्ये असलेल्या कपावर एक चांगला घरगुती उपाय आहे. सर्दीमुळे जर श्वासोच्छ्वास करायला त्रास होत असेल तर गरम पाण्याच्या वाफेने नाकपूड्या मोकळ्या होतात. आणि त्यामध्ये ओवा टाकून जर गरम पाण्याची वाफ घेत असाल तर श्वासोच्छ्वास संबंधी अनेक समस्या कमी होतात.

दैनंदिन आहारात भाजीपाला आणि फळांचा समावेश
भाजीपाला आणि फळांपासून आपल्या शरीरातील विटामीन्सची कमतरता भरून निघते. विटामीन A, C आणि E हे सर्व भाजीपाला आणि फळांपासून मिळते. भाजीपाला आणि फळांचे सेवन नियमित केल्याने आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते.

पौष्टिक आहार आणि वेळेवर जेवन – आपन जर दैनंदिन जीवनात पौष्टिक आहार घेत नसाल तर सतत आजारी पडण्याचे हे सुध्दा कारण असू शकते. पौष्टिक आहारातून सर्व घटक आपल्या शरीराला मिळतात आणि निरोगी राहण्यास मदत होते. बाकी गोष्टींकडे लक्ष देणे जेवढे महत्वाचे आहे तेव्हढेच वेळेवर जेवन करणे महत्वाचे आहे. आपले शरीर वेळेवर जेवन मागत असते जर त्यावेळेत भेटले नाही तर भुक लागण्याच्या प्रक्रियेवर आणि पचन क्रियेवर त्याचा परिणाम होतो. त्यासाठी वेळेवर जेवन करा.

Leave a Comment