ही तिसरी मुंबई असणार लय भारी; नवीन बनणाऱ्या शहरातील सुविधांची यादी पाहून घर घेण्याची होईल इच्छा..

अलीकडच्या काळात मुंबईत घर (1 BHK Flats Mumbai) घेणाऱ्यांची आणि तिथेच स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस मुंबईत येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने मुंबईतील पायाभूत सुविधा तसेच मुंबईतील वाहतूकीच्या सुविधांवर सतत वाढत असणारा ताण लक्षात घेता महाराष्ट्र राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या धर्तीवर नवी मुंबई विमानतळा जवळपास असलेल्या परिसरात एक नवीन शहर उभारण्यात येणार असून त्या शहराचं नाव ‘तिसरी मुंबई’ असं असणार आहे. येथील सुविधा पाहता या तिसर्‍या मुंबईत फ्लॅट (1 BHK Flat Mumbai) घेणे खूपच फायद्याचे ठरू शकते.

हिंदुस्तान टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूच्या अंतर्गत (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हे शहर मुख्य मुंबई शहराशी जोडण्यात येणार आहे.. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपूर्वीच सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. 

मुंबईकरांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट; म्हाडा संदर्भात सरकारची मोठी घोषणा, येथे क्लिक करून पहा बातमी..

सुविधांच्या बाबतीत मुख्य मुंबईला सुद्धा टाकणार मागे? 

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (MMRDA) या नवीन मुंबई शहराच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या नवीन मुंबईमध्ये पनवेल, उल्वे, कर्जत, पेण आणि उरण तसेच जवळपासच्या परिसरातील 323 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्राचा समावेश असणार आहे. यात ‘नैना’ प्रकल्पामधील गावे देखील असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एखाद्या विकसित झालेल्या शहरात जेवढ्या सोई-सुविधा असतात त्या सर्व सोई-सुविधा या नव्या उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईमध्ये असणार, असं सांगितलं जात आहे. 

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

नव्या शहरात या असणार सुविधा

या उभारण्यात येणार्‍या नवीन शहरात मल्टीनॅशनल कंपन्या, नॉलेज पार्क, निवासी संकुलं आणि डेटा सेंटर अशा सुविधा या नवीन शहरामध्ये असणार आहेत.
तसेच सार्वजनिक प्रवासाची उत्तमोत्तम सुविधा याठिकाणी असणार आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पनवेल आणि उरणमधील 23 गावांमध्ये सिडकोच्या माध्यमातून तब्बल 12 हजार कोटी एवढ्या खर्चातून रस्तेबांधणीचे काम करण्यात येणार आहे. 

सामान्यांना समृद्धीलगत नवनगरात म्हाडाची घरे मिळणार? समृद्धीलगत म्हाडाचे घर पाहिजे का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

या नव्या शहरात म्हणजेच तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीमागे देशाची अर्थव्यवस्था बळकट करणे हा सुद्धा हेतू असणार आहे. ज्याअंतर्गत खारघर येथे दुसरे बीकेसी (BKC) प्रस्तावित आहे. येथील सुविधा आणि भविष्यामधील संधी पाहता तुम्ही देखील आता या नवीन तिसर्‍या मुंबईत घर (1 bhk flat Mumbai) घेण्याचा विचार कराल असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

Leave a Comment