दिल्लीतील लॉकडाउन वाढवला, परिस्थिती चिंताजनक…!

दिल्ली : बिघडलेली परिस्थिती लक्षात घेऊन गेल्या आठवडाभरापुर्वी दिल्ली मध्ये लॉकडाउन करण्यात आला होता. पण संसर्ग आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाउन वाढवला आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत लॉकडाउनची घोषना करण्यात आली होती. 3 मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आल्याचं अरविंद केजरीवालांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

दिल्लीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. दिल्लीत कडक लॉकडाउन लावावं असं जनतेचं मत आहे. म्हणून हे निर्बंध आणखी आठ दिवस वाढवल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. सध्या दिल्लीतील पॉजिटिव रेट 36 ते 37 टक्के आहे.
तो अगोदर एवढा नव्हता. दिल्लीला मिळणारा आॅक्सिजन 480 मेट्रिक टन होता आता तो 490 मेट्रिक टन करण्यात आला आहे. सध्या 350 ते 335 मेट्रिक टन मिळत आहे. पण दिल्लीला 700 मेट्रिक टन आॅक्सिजनची आवश्यकता आहे.

केजरीवाल यांनी माहितीच्या अपडेटसाठी एक पोर्टल तयार केल्याचं सांगितलं. त्यावर कोणत्या रुग्णालयाकडे किती आॅक्सिजन शिल्लक आहे आणि पुरवठादाराने किती आॅक्सिजन पुरवला याची माहिती शासनाला त्याद्वारे मिळणार आहे. ही माहिती रुग्णालयांना आणि पुरवठादारांना दर दोन तासाला अपडेट करावी लागणार आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळतांना काही ठिकाणी अपयश आल्याचं ते म्हणाले. मात्र काही ठिकाणी आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती त्यांनी दिली.

ते पुढे बोलताना म्हणाले की देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आॅक्सिजन शिल्लक असल्यास पुरवठा करण्या संदर्भात पत्र लिहिले आहे. या बिकट परिस्थितीत सर्वजण मिळून सोबत काम करत आहोत. थोड्याच दिवसात हे संकट निघून जाईल. केंद्र सरकार कडून सहकार्य मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment