लॉटरीची तारीख ठरली! आता म्हाडाच्या घरांची सोडत या दिवशी, पहा बातमी..!

Mhada Flats : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये म्हाडाच्या लॉटरी संदर्भात एक मोठी बातमी आली आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या (Pune Mhada) घरांच्या सोडतीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनेतील (Housing Scheme) 5 हजार 863 एवढ्या घरांसाठीची ही लॉटरी आहे.

पुणे मंडळाची ही लॉटरी पुढे ढकलण्यात आली होती. पण तारीख निश्चित नव्हती. पण आता म्हाडाच्या पुणे (Pune Mhada) घरांसाठी असलेली सोडत अखेर जाहीर झाली आहे. येत्या 05 डिसेंबरला संगणकीय सोडतीमध्ये विजेत्यांची नावे घोषित केली जाणार आहे. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर याठिकाणच्या वेगवेगळ्या गृहनिर्माण योजनेमधील 5 हजार 863 एवढ्या घरांसाठी लॉटरी जाहीर झाली होती.

अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; येथे क्लिक करून पहा माहिती..

आता याची संगणकीय सोडत पुणे जिल्हा परिषद सभागृह याठिकाणी येत्या 05 डिसेंबरला सकाळी 9 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये काढली जाणार आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून गेल्या 05 सप्टेंबर रोजी या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी तसेच अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर या सोडतीला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून 5863 एवढ्या सदनिकांसाठी जवळपास 60 हजार एवढे अर्ज प्राप्त झाले आहे.

म्हाडा भाडे तत्वावर देणार फ्लॅट, गाळे; येथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार लाभ?

या जिल्ह्यांमध्ये म्हाडाची घरे (Mhada Flats)

म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीमध्ये पुणे जिल्ह्यामधील 5425 घरे, सांगली – 32, सोलापूर – 69, कोल्हापूर – 337 एवढी घरे विक्रीकरिता उपलब्ध आहेत. याच सोडतीमध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेमधील 403 घरे, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) – 431 एवढी घरे आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून 2584 घरे व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेच्या माध्यमातून 2445 एवढी घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत…

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

Leave a Comment